प्रदर्शनीय सामन्यात जीसीएचा रोमहर्षक विजय…

अटीतटीच्या लढतीत गोवा क्रीडा पत्रकार संघटनेवर मात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : परेश फडते व प्रकाश मयेकर यांच्या अभेद्य भागिदारीच्या जोरावर गोवा क्रिकेट संघटनेने (जीसीए) अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत गोवा क्रीडा पत्रकार संघटनेचा (एसजेएजी) पराभव केला.
हेही वाचाःराज्यात ‘या’ भागात आज पुन्हा अवकाळी सरी शक्य…

सुशांत नाईकने शानदार यष्टिरक्षण केले

प्रथम फलंदाजी करताना गोवा क्रीडा पत्रकार संघटनेने सर्व गडी गमावत १५ षटकांत ८१ अशी धावसंख्या उभारली. विल्यमन्सने १२ तर अनिरुद्ध राऊळने ९, संतोष कुबलने ७ धावा जोडल्या. जीसीएकडून विजय खोलमकरने ३, परेश फडतेने २, तर विजय कुचडकर, प्रकाश मयेकर, सिद्धेश, आनंद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. जीसीए संघाकडून सुशांत नाईकने शानदार यष्टिरक्षण केले.
हेही वाचाःचेंबरमधील पाण्यात बुडून एका कामगाराचा मृत्यू…

सूत्रबद्ध गोलंदाजी करीत सामना आपल्या बाजूने वळवला

प्रत्युत्तरात खेळताना जीसीएने लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. सुरेश महादेवन (९) व रुपेश (१२) हे माघारी परतल्यानंतर एकवेळ गोवा क्रीडा पत्रकार संघटनेने सूत्रबद्ध गोलंदाजी करीत सामना आपल्या बाजूने वळवला होता. परंतु त्यानंतर परेश फडते (नाबाद २७) आणि प्रकाश मयेकर (नाबाद १४) यांनी चौथ्या विकेटसाठी अभेद्य भागिदारी करीत जीसीएचा विजय साकारला. एसजेएजीकडून महेश गावकरने ३ तर विजयने २ गडी बाद केले. 
हेही वाचाःगोवा : नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या हजारो युवकांसाठी खूशखबर!…

विजयी व उपविजयी ठरलेल्या संघांना चषक प्रदान

बक्षीस वितरण सोहळ्याला पणजी जिमखानाचे सदस्य तथा माजी जकात अधिकारी महेश देसाई, जीसीएचे खजिनदार परेश फडते, प्रशिक्षक संचालक प्रकाश मयेकर, एसजेएजीचे अध्यक्ष महेश गावकर आदींची उपस्थिती होती. विजयी व उपविजयी ठरलेल्या संघांना चषक प्रदान करण्यात आले. तर एसजीएजीकडून जीसीए व पणजी जिमखाना यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. रोहन श्रीवास्तव, अनिरुद्ध राऊळ, राजतिलक नाईक, लौकिक शिलकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हेही वाचाःकन्नडिगांना निवडणूक लढवण्यास आरजीचा विरोध, ‘हे’ आहे कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!