वर्ल्ड कॅडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत ‘गोव्याचा’ एथन वाझची चमकदार कामगिरी…

स्पर्धेच्या ४ फेऱ्यांनंतर गोव्याचा एथन वाझने ४ गुणांची कमाई केली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : बाटुमी, जॉर्जिया येथे सुरू असलेल्या फिडे वर्ल्ड कॅडेट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२२ (अंडर-१२ ओपन) मध्ये ११ राउंडच्या स्विस सिस्टम स्पर्धेच्या ४ फेऱ्यांनंतर गोव्याचा एथन वाझने ४ गुणांची कमाई केली आहे.
हेही वाचा:गौरव बिद्रे याच्याविरोधात ३०३ पानी आरोपपत्र दाखल…

४ फेऱ्यांच्या शेवटी संयुक्त पहिल्या स्थानावर आणि टायब्रेकवर दुसऱ्या स्थानावर

तुर्कीच्या उटलू मुस्तफा अली (एलो १३८६) आणि कॅनडाच्या झू चॅरिस (एलो १३५०) विरुद्ध पहिले दोन गुण मिळवल्यानंतर, एथनने टॉप बोर्डवर खेळताना इराणच्या द्वितीय मानांकित एफएम मोवाहेद सिना (एलो २३४५) याला पराभूत केले. चौथ्या फेरीत एथनने फिडे ध्वजाखाली खेळणाऱ्या रशियाच्या लिसेनकोव्ह स्व्याटोस्लाव (एलो २०६९) याला पराभूत केले. ४ फेऱ्यांच्या शेवटी एथन संयुक्त पहिल्या स्थानावर आणि टायब्रेकवर दुसऱ्या स्थानावर आहे. ५व्या फेरीत एथनचा सामना स्पर्धेतील अव्वल मानांकित रशियाच्या (फिडे ध्वजाखाली खेळत आहे) एफएम उसकोव्ह आर्टेम (एलो २३७७) याच्याशी होईल.     
हेही वाचा:काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा… 

६९ देशांचे प्रतिनिधित्व करणारे १५६ सहभागी

या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय अंडर-१२ ओपन चेस चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यामुळे एथनची फिडे वर्ल्ड कॅडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. जागतिक कॅडेट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप १६ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत नियोजित आहे आणि ती अनुक्रमे खुल्या आणि मुलींच्या गटात ८, १० आणि १२ वर्षांखालील वयोगटातील ६ स्पर्धांच्या संचाच्या रूपात आयोजित केली जात आहे. १२ वर्षांखालील खुल्या गटात, ज्यामध्ये एथन भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, ४ फिडे मास्टर्स आणि ३ उमेदवार मास्टर्ससह ६९ देशांचे प्रतिनिधित्व करणारे १५६ सहभागी आहेत. एथनने त्याचे प्रायोजक जिनो फाऊंडेशनचे आणि त्यांच्या क्राउडफंडिंग मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणे मला अभिमानास्पद वाटत आहे आणि मी माझे सर्वोत्तम देईन.
हेही वाचा:वाळू भराव नष्ट करण्यासह बेकायदेशीर वृक्षतोड…

      

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!