इंग्लंडचीही हॉकी विश्वचषकातून माघार

कोविड -19 च्या संकटामुळे माघार घेत असल्याचं दिलं कारण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोविड -19 च्या संकटामुळे भारताने बर्मिंघममधील कॉमनवेल्थ खेळातून माघार घेतली आहे. दरम्यान हेच कारण देत इंग्लंडनेदेखील आगामी पुरुष हॉकी विश्वचषक जो भारतातील भुवनेश्वर येथे होणार आहे, त्यातून माघार घेतली आहे.

ब्रिटन येथे कोरोनासंबधी नियम अधिक कठोर

हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबम यांनी दिलेल्या माहितीत ते म्हणाले, इंडियन हॉकी संघाचे पुरुष आणि महिला दोन्हीही आगामी कॉमनवेल्थ खेळांमध्ये खेळणार नाहीत. कारण खेळ होत असलेल्या ब्रिटन येथे कोरोनासंबधी नियम अधिक कठोर केले आहे. लसीचे दोन्ही डोस झालेल्या भारतीयांनाही 10 दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या या भेदभावपूर्ण नियमांमुळे भारताने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान भारतीय पुरुष हॉकी संघ 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदकाच्या सामन्यादरम्यान इंग्लंडकडून 1-2 ने पराभूत झाला होता. तर महिला संघाला 0-6 ने मोठा पराभव झेलावा लागला होता . त्यानंतर यंदा मात्र कॉमनवेल्थमध्ये भारत आणि इंग्लंड हा सामना पाहता येणार नाही.

लसीकरणानंतरही क्वारंटाईनचा नियम

ब्रिटनने भारताच्या कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्राला मान्यता द्यायला नकार दिला आहे, त्यामुळे भारतातून इंग्लंडमध्ये गेलेल्या प्रवाशाने लसीचे दोन्ही डोस घेतले असले, तरी त्याला 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागतं. ब्रिटनच्या या नियमानंतर भारतानेही इंग्लंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अशाचप्रकारचे नियम केले. इंग्लंडमधून भारतात आलेल्या प्रवाशांना 72 तासांमध्ये आरटी-पीसीआर रिपोर्ट देणं बंधनकारक करण्यात आलं. भारतात पोहोचल्यानंतर विमानतळावर आणि मग आठव्या दिवशी त्यांच्या दोन आरटी-पीसीआर टेस्ट करव्या लागणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!