दिएगो माराडोना यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

ब्युरो : अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो म‌ॅराडोना यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गोव्यासह जगभरातील फुटबॉल रसिकांचे आवडते खेळाडू म्हणून दिएगो मॅराडोना यांचे नाव घेतले जाते. मॅराडोना यांना मागील दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

1986मध्ये अर्जेंटिनाला विश्वकरंडक मिळवून दिला

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून दिएगो यांचे नाव आदराने घेतले जाते. 1986च्या विश्वचषकात अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!