पंजाबविरुद्ध पराभवानंतर दिल्लीच्या गोटात खळबळ…

कर्णधार श्रेयस अय्यरकडून कबुली

Goan Varta Live | प्रतिनिधी

स्कोअर बोर्डवर खाली असलेली किंग्ज इलेव्हन पंजाब गेल्या ३ सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसतेय . बंगळुरु, मुंबई आणि दिल्ली यांच्यावर मात करत पंजाबने स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलंय. शिखर धवनच्या शतकी खेळाच्या जोरावर दिल्लीनं पंजाबविरुद्ध सामन्यात १६४ धावांपर्यंत मजल मारलीये. परंतू पंजाबने हे आव्हान निकोलस पूरनच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलंय. पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दिल्लीच्या संघात चिंतेचं वातावरण तयार झालंय ,त्यामुळे पुढील सामने अधिक जबाबदारीने खेळणं गरजेचं असल्याची कबुली कर्णधार श्रेयस अय्यरने दिलीय.

“आमच्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे, या पराभवामुळे संघातील त्रुटींकडे लक्ष देणं गरजेचं आहे . यापुढे अशाच कठीण परिस्थितीमध्ये तुल्यबळ संघांविरोधात आमचा सामना होणारे. आतापर्यंत आम्ही खूप चांगला खेळ केलाय, पण जे झालं ते आता पाठीमागे सोडायला हवं. सर्व खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून चांगला खेळ करण्याची गरज आहे. प्ले-ऑफसाठी आम्हाला एका विजयाची गरज आहे, त्यामुळे यापुढील सामन्यांसाठी गरजेनुसार रणनिती आखली जाईल.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यरने कबुली दिलिये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!