प्लेऑफच्या शर्यतीतून दिल्ली बाहेर…

मुंबई इंडियन्सची कॅपिटल्सवर ५ गडी राखून मात : रॉयल चॅलेंजर्सचा बाद फेरीत प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : आयपीएलचा ६९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यातील पराभवानंतर दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.     
हेही वाचाःम्हापसात कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू… 

रोहित शर्मा संघर्ष करताना दिसला

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचा कर्णधार रोहित शर्मा संघर्ष करताना दिसला. त्याने १३ चेंडूत केवळ २ धावांची खेळी खेळली. त्याला एनरिक नॉर्कियाने आपला बळी बनवले. तो बाद झाल्यानंतर इशान किशन आणि ब्रेव्हिस यांनी डावाची धुरा सांभाळली. यादरम्यान दोघांनी ५१ धावांची भागिदारी केली. मात्र, इशान किशनला पुन्हा एकदा ही मोठी खेळी खेळता आली नाही आणि तो ४८ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर ब्रेव्हिसही खेळपट्टीवर फार काळ टिकू शकला नाही आणि ३७ धावा करून शार्दुल ठाकूरचा बळी ठरला.
हेही वाचा:’हे’ आहेत पेट्रोल-डिझेल चे ‘नवे’ दर…

डेव्हिड खूपच आक्रमक दिसत होता

तो बाद झाल्यानंतर टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनी संघाची धावसंख्या पुढे नेली. दोघांनी ५० धावांची भागिदारी केली. यावेळी टीम डेव्हिड खूपच आक्रमक दिसत होता. त्याने केवळ ११ चेंडूत ३४ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. त्याला शार्दुल ठाकूरने आपला बळी बनवले. तो बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि रमणदीप सिंग यांनी संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. मात्र, यादरम्यान तिलक वर्मा २१ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर रमणदीपने संघाला आणखी धक्का बसू दिला नाही आणि ५ चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचाःयेत्या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी, वाचा सविस्तर…

ऋषभ पंतनेही चांगली खेळी केली

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोव्हमन पॉवेलने संघासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने ३४ चेंडूत ४३ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतनेही चांगली खेळी केली. या सामन्यात दिल्लीची सुरुवात खराब झाली. पण पॉवेल आणि पंत यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी धोकादायक गोलंदाजी केली. त्याने ३ बळी घेतले.            
हेही वाचाःएवढ्या रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार !

रोव्हमन पॉवेलने चांगली खेळी केली

दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर सलामीला आले. यादरम्यान वॉर्नर केवळ ५ या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्शनेही त्याची विकेट गमावली. बुमराहच्या चेंडूवर तो शून्य धावांवर बाद झाला. तसेच सर्फराज खानही स्वस्तात गेला. तो वैयक्तिक १० धावांवर बाद झाला. कर्णधार ऋषभ पंतने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या. रोव्हमन पॉवेलने चांगली खेळी केली. त्याने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. पॉवेलने ३४ चेंडूंचा सामना करत ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. त्याला बुमराहने आपला शिकार बनवले. शार्दुल ठाकूर ४ धावा करून बाद झाला. अखेरीस अक्षर पटेलने २ षटकारांच्या मदतीने नाबाद १९ धावा केल्या. अशाप्रकारे दिल्लीने २० षटकांत ७ गडी गमावून १५९ धावा केल्या. 
हेही वाचाः’गोवन वार्ता लाईव्ह’च्या किशोर नाईक गावकरांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

बुमराहने शानदार गोलंदाजी केली

मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २५ धावा देत ३ बळी घेतले. मयंक मार्कंडेयनेही चांगली कामगिरी केली. त्याने ४ षटकांत २६ धावा देत एक विकेट घेतली. डॅनियल सॅम्सने ४ षटकांत ३० धावा देत एक विकेट घेतली. हृतिक शोकीनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. त्यांला काही यश मिळाले नाही.
हेही वाचाःनव्या राजभवनाची पायाभरणी; ३० रोजी राष्ट्रपती गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!