‘गोईंग गोईंग गॉन…’ अशी कॉमेन्ट्री करणारा अवलिया क्रिकेटर कालवश

माजी ऑस्ट्रेलीयन क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर डीन जोन्स यांचं अकाली निधन

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

मुंबई : 2020 हे सालं आपल्यापासून काय काय हिरावून घेणार आहे, असा प्रश्न आता क्रिकेट विश्वातूनही विचारला जाऊ लागला आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे आज येऊन धडकलेली आणखी एक दुःखद बातमी. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू फलंदाज डीन जोन्स (Dean Jones) यांचं निधन झालंय. त्यांच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं.

मुंबईत डीन जोन्स यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या यूएई येथे सुरू असलेल्या आयपीएलसाठी ते स्टार स्पोर्टस वाहिनीकरिता समालोचक म्हणून मुंबईतून काम पाहात होते. आपल्या सदाबहार कॉमेन्ट्रीसाठी ते नेहमीच चर्चेत होते. डीन यांच्या निधनानं जोन्स कुटुंबावर तर शोककळा पसरली आहे, मात्र ऑस्ट्रेलिय क्रिकेटचंही फार मोठं नुकसान झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीये.

ऑस्ट्रेलियासाठी धडाकेबाज फलंदाजी डीन जोन्स यांनी केली होती. अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर होते. गोईंग… गोईंग. गॉन… असं म्हणणाऱ्या डीन जोन्स यांच्या अकाली एक्झिटने क्रिकेटप्रेमी हळहळलेत. जोन्स यांनी अवघ्या 52 कसोटी सामन्यांत तब्बल 46.55च्या सरासरीने 3 हजार 631 इतक्या धावांचा डोंगर उभा केला होता. तडाखेबाज फलंदाजी करत आपल्या काळातील दमदार अशी 216 धावांची दर्जेदार इनिंगही कायमच चर्चिली जाते. त्यांनी एकूण 11 शतकेही झळकावली. एकूण 164 एकदिवसीय सामन्यात सात सॅन्युरी आणि 49 हाफसेन्चुरीसह त्यांनी 6 हजार 68 धावा केल्या. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेटवर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही डीन जोन्स यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलाय.
भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही डीन जोन्स यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!