CSK स्पर्धेतून बाहेर

राजस्थानच्या रॉयल विजयामुळे उरल्या सुरल्या अपेक्षाही संपल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

आयपीएलमध्ये प्लेऑफ खेळण्यासाठी सात संघ स्पर्धा करतात तर चेन्नई सुपरकिंग्स सहज प्लेऑफमध्ये पोहचतो असं अनेक क्रिकेट चहाते म्हणतात. मात्र आयपीएल 2020 मध्ये हे चित्र पालटल्याचे दिसतयं . यंदाचे आयपीएल चेन्नईसाठी फारसे चांगले ठरलेले नाहीये. त्यामध्ये अगदी धोनीची कामगिरी असो, खेळाडूंनी माघार घेणे असोत किंवा फलंदाजीत सातत्य नसणे असो सर्व काही चेन्नईच्या विरोधातच दिसलंय. त्यामुळेच 2008 पासून म्हणजेच आयपीएल सुरु झाल्यापासून अबाधित ठेवलेल्या विक्रमात आता खंड पडणारे. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सच्या संघावर आठ गडी राखवून विजय मिळवल्याने चेन्नईचा संघ अधिकृतरित्या आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. प्लेऑफआधी चेन्नईचा संघ बाहेर पडण्याची ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचं दिसतयं.

चेन्नईने आतापर्यंत आयपीएलमधील चार सामने जिंकले असून त्यांचे एकूण आठ गुण आहेत. चेन्नईच्या संघाचे दोन सामने शिल्लक राहिले असून हे दोन्ही सामने जिंकले तरी त्याचे एकूण गुण १२ होतील. चेन्नईने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी सध्या स्कोअर बोर्ड पाहिल्यास दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्यापेक्षा पुढेच असणारे. सध्या दिल्ली आणि आरसीबीचे प्रत्येकी १४ गुण आहेत. तर उरलेल्या कोलकाता, हैदराबाद, पंजाब आणि राजस्थानसारख्या संघांचे भवितव्य त्यांच्या पुढील सामन्यांवर अवलंबून असणारे. हे संघ एकमेकांविरोधात खेळतात पराभूत झाल्यास त्यानुसार क्रमवारी ठरणारे. विशेष म्हणजे काहीही झालं तरी या संघाचे गुण हे चेन्नईच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा अधिकच राहतील. त्यामुळेच चेन्नईने सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी ते स्पर्धेबाहेर जाणार हे नक्की झालंय.

चेन्नईचा आतापर्यंतचा प्रवास

2008 साली आयपीएलची सुरुवात झालेली त्यावेळी चेन्नईच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा पराभव केला होता. 2009 साली चेन्नईचा संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारु शकला. २०१० मध्ये चेन्नईने पहिल्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरलं. 2011 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी चेन्नईने ही स्पर्धा जिंकली.2012 मध्ये चेन्नई उपविजेता संघ ठरला. 2013 मध्येही चेन्नईला अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यात अपयश आलं. 2014मध्ये चेन्नईचा संघ एलिमिनेटर फेरीत बाहेर गेला.2015 मध्ये चेन्नई पुन्हा एकदा उपविजेता ठरला.2016 आणि 2017 मध्ये चेन्नईच्या संघावर बंदी घालण्यात आल्याने संघ स्पर्धेत सहभागी झाला नव्हता.2018 मध्ये दोन वर्षानंतर मैदानावर आलेल्या चेन्नईच्या संघाने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरलं. 2019 मध्ये चेन्नई आणि मुंबईदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने बाजी मारलीय. तर यंदा ग्रुप स्टेजमध्येच चेन्नईचे आव्हान संपुष्टात आलंय.

हेही वाचा

आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ : महिलांनी लुटलं सोनं

https://www.goanvartalive.com/sports/indian-team-bags-gold-in-asian-online-chess-championship-2020/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!