Cricket | पार्से-पेडण्यातील महिला टेनिस क्रिकेट लीगची खास फोटोस्टोरी

धृव क्लबच्या स्पर्धेला तुफान प्रतिसाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आयपीएलच्या धर्तीवर राज्यात पहिल्यांदाच पेडणे प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून आपली एक वेगळी ओळख बनवलेल्या पार्से – पेडणे येथील धृव स्पोर्टस एण्ड कल्चरल क्लबने आणखी एक इतिहास रचलाय. पेडणे तालुक्यात किंबहुना राज्यात पहिल्यांदाच महिला टेनिस क्रिकेट लीगचे यशस्वी आयोजन करून या संस्थेने सर्वांची वाहवा मिळवली आहे.
तुये येथील सुरेश रैना क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत रॉयल स्ट्रायकर्स वेळगे संघाने मेटेओराईटस पर्वरी संघावर मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तिसऱ्या स्थानावर धृव पार्से तर चौथ्यास्थानी श्रीमती क्लबने बाजी मारली. सोनाली दातेकर (उत्कृष्ट गोलंदाज), वनिता भंडारी (उत्कृष्ट फलंदाज) रोशन कांदगाल (उत्कृष्ट यष्टीरक्षक), पुष्पा आंगडी (उत्कृष्ट फिल्डींग), स्विटी परब(मालिकावीर) यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

बक्षिस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अनिता पै काकोडे तर सन्माननीय अतिथी म्हणून अनुजा गावणेकर आणि रेशा कोरगांवकर यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी धृवचे चेअरमन दीपक कळंगुटकर, क्लबचे अध्यक्ष संदीप राणे, सितारा मांद्रेकर, हर्षाली तळकटकर आणि राजेश गांवस हजर होते.

पाहा खास फोटो

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!