Cricket | आयसीसीकडून नियमांमध्ये ‘मोठे बदल’, ‘हे’ आहेत नवे नियम, वाचा सविस्तर…

नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील

Goan Varta Live | प्रतिनिधी

दुबई : आयसीसीने मंगळवारी क्रिकेटच्या अनेक नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत. यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी रन्सपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 
हेही वाचा:Goa Politics | गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलिन करणार?

नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार

कोविड-१९ च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. सर्व नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) मांडल्या आहेत. साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते. असेच काहीसे यावेळीही पाहायला मिळाले.
हेही वाचा:SHOCKING | कॉमेडीचा बादशाह गेला, राजू श्रीवास्तव यांचे निधन

क्रिकेटचे नवे नियम याप्रमाणे…

१. खेळाडू चेंडूवर थुंकू शकणार नाहीत. हा नियम गेल्या दोन वर्षांपासून लागू असून भविष्यातही तो कायम राहणार आहे.

२. जर एखादा खेळाडू झेलबाद झाला, तर त्याच्या जागी येणारा नवा फलंदाजच स्ट्राइक घेईल, जरी बाद झालेल्या फलंदाजाने झेल घेण्यापूर्वी स्ट्राईक बदलली असली तरीही.

३. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला दोन मिनिटांत खेळपट्टीवर यावे लागेल. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दीड मिनिटांचा नियम कायम राहील.

४. जर गोलंदाजाच्या चुकीमुळे चेंडू खेळपट्टीपासून दूर पडला, तर स्ट्रायकर अजूनही चेंडू खेळू शकतो, परंतु फलंदाजाची बॅट किंवा पाय किंवा कोणताही भाग खेळपट्टीमध्ये असणे आवश्यक आहे. कोणत्याही चेंडूने फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडले तर त्याला नो बॉल म्हटले जाईल.

५. गोलंदाजीसाठी धावताना क्षेत्ररक्षणाच्या बाजूने कोणत्याही प्रकारची अयोग्य कृती केल्यास पंच त्या चेंडूला डेड बॉल देऊ शकतात तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा फायदा देऊ शकतात.

६. मंकडिंग अधिकृत रन आऊट मानले जाईल. जेव्हा नॉन-स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन बॉलरने बॉल टाकण्यापूर्वी क्रीजमधून बाहेर येतो आणि बॉलर हात थांबवून त्या टोकाच्या बेल्स टाकतो तेव्हा त्याला मंकडिंग म्हणतात.

७. पूर्वी, जर एखाद्या गोलंदाजाने पाहिले की स्ट्रायकरने चेंडू टाकण्याआधी एक हालचाल केली आहे, तर तो त्या फलंदाजाला धावबाद करण्यासाठी चेंडू फेकू शकत होता, आता असा चेंडू डेड बॉल मानला जाईल.
हेही वाचा:धक्कादायक : ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती, गोव्यातील समुद्र किनाऱ्यांना बसणार फटका…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!