कोरोनाने केलं ‘आयपीएल’ला क्लिन बोल्ड!

स्पर्धा रद्द करण्याचा बीसीसीआयचा निर्णय

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे इंडियन प्रॅमियर लिग अर्थात आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. काही खेळाडू कोविडबाधित झाल्यानंतर दबाव वाढला आणि बीसीसीआयनं हा निर्णय घेतला.

बायो बबलचा अवलंब करून खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफच्या सुरक्षेची काळजी घेत आयपीएल सुरू होती. मात्र सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या तीन खेळाडूंना कोरानाबाधा झाली. ताज्या माहितीनुसार सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानं आणखी धोका न पत्करता बीसीसीआयनं स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सध्या ही स्पर्धा तात्पुरती रद्द केल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटलंय. कोविडचा प्रादूर्भाव आटोक्यात आल्यानंतर स्पर्धा पुन्हा खेळवली जाईल, असं सांगण्यात आलंय. या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला असला, तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं उशीरा सुचलेलं शहाणपण दाखवल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!