#IPL 2020 : दुखापतींनी ग्रासलं, दोन गोलंदाजांची स्पर्धेतून माघार

करोनाच्या पार्श्वभूमीवर दुबईत खेळविण्यात येत असलेल्या आयपीएल-2020 स्पर्धेत खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. दोन गोलंदाजांनी दुखापती चिघळू नयेत म्हणून स्पर्धेतूनच माघार घेतली आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

दुबई : ”ड्रीम इलेव्हन आयपीएल 2020” स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादला मोझा झटका बसला आहे. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) बोटाला झालेल्या दुखापतीमुळं स्पर्धेतून माघार घेतल्यानं फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीला धक्का बसला आहे. दुसरीकडं, मांडीचे स्नायू ताणले गेल्यानं भुवनेश्वर कुमारनंही (Bhuvneshwar Kumar) स्पर्धेतून काढता पाय घेतला. याचा परिणाम सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजीवर होउ शकतो.

अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यामुळं आयपीएलमध्ये सातत्यानं सर्रास कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळत असताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली होती.

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात अमितच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं होतं. त्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. तो पुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. अमित मिश्रा चांगल्या फॉर्मात होता. त्याचा अनुभव संघातील इतर गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरायचा. कोलकात्याविरुद्ध मिश्राने स्फोटक फलंदाज शुबमन गिलची (Shubman Gill) विकेट घेतली होती.

दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबाद संघासमोरही संकट निर्माण झालं आहे. प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे यापुढे खेळू शकणार नाही. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात खेळत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला १९ वं षटक पूर्ण टाकता आलं नाही.

चेन्नईविरुद्ध सामन्यात दुखापत झाल्यानंतर मुंबईविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर खेळू शकला नाही. दुखापत लक्षात घेऊन भुवनेश्वरने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!