Video | भरतनाट्यम स्टाईल बॉलिंग टाकणाऱ्याला पाहिलं की नाही?

युवराज सिंहने शेअर केला व्हिडीओ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : क्रिकेटला भारताता एका धर्मापेक्षाही मोठं मानलं जातं, यात दुमत नाहीच. या क्रिकेटचे कित्येक किस्से ऐकायला आणि पाहायला मिळतात. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा खरंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने शेअर केलाय. मैदानात आक्रमक समजला जाणारा युवराज ऑफ द फिल्ड किती जॉली आहे, हे तर आपण सगळ्यांनी पाहिलं आहेत. युवराजने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन एका ऑफ स्पिनरचा व्हिडीओ शेअर केलाय. ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा हा खेळाडू चक्क भरतनाट्यम करत बॉलिंग करत करतोय.

प्रत्येक क्रिकेटर आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. दिलस्कूप, हेलिकॉप्टर शॉट अशा काही वेगळ्या फटाक्यांनी क्रिकेटपटूंमधील फटक्यांना ओळखलं जातं. गोलंदाजांमध्येही प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते. अशाच एका अजब गजब प्रकारच्या गोलंदाजाचा व्हिडीओ सध्या गाजतोय. चक्क भरतनाट्यम करत गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं युवराज सिंहचं लक्ष वेधून घेतलंय. युवराजनं हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर करत हरभजन सिंहला खोचक सवाल केलाय. हरभजन सिंहची बॉलिंग एक्शनही तुफान गाजली होती. त्यामुळे हरभजनला टोला लगावत या गोलंदाजाची एक्शन पाहून युवीनं भज्जीला प्रतिक्रिया द्यायला सांगितलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!