BGT IND vs AUS, 4TH TEST AHEMDABAD : या खेळाडूवर चाहते संतापले, चौथ्या कसोटीच्या सुरुवातीलाच केली मोठी चूक
भारतीय संघ सध्या अहमदाबादच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात केएस भरतने मोठी चूक केली.

ऋषभ | प्रतिनिधी

अहमदाबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळला जात आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांना कसोटी कॅप्स बहाल केल्या. सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतने कॅच सोडला, त्यानंतर तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.
केएस भरतकडून मोठी चूक!
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड 7 धावांवर खेळत असताना केएस भरतने उमेश यादवचा एक सोपा झेल सोडला आणि सर्वजण थक्क झाले. बॅटला आदळल्यानंतर चेंडू थेट त्याच्या हाताकडे आला, पण तो पकडू शकला नाही. यानंतर गोलंदाज उमेश आणि कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर अजिबात खूश नव्हते. यानंतर रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला रवींद्र जडेजाने झेलबाद केले. त्याने 32 धावा केल्या.
चाहते संतापले
एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, केएस भरत हा ऋद्धिमान साहासारखा सर्वोत्तम यष्टिरक्षक नाही. त्याचवेळी अनेक चाहते त्याच्या खराब परफॉर्मेंसची तुलना रिषभ पंत सोबत करताहेत. भरतने कॅच सोडल्यानंतर ट्विटरवर चाहते त्याची खिल्ली उडवत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी
केएस भरत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपल्या लौकिकास साजेशी खेळी साकारू शकला नाहीये . त्याच्या बॅटमधून धावा निघणे कठीण झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये 8, 6, 23, 17 आणि 3 धावा केल्या आहेत. बॅटने खराब प्रदर्शन केल्यानंतर, तो यष्टिरक्षणातही छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे.