2022च्या IPLमध्ये दिसणार 2 नवे संघ, BCCIचा मोठा निर्णय

गुरुवारी झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आयपीएल चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहेत. 2022मध्ये होणाऱ्या आयपीएल एकूण 10 संघ असणार आहे. गुरुवारी झालेल्या बीसीसीआय़च्या बैठकीत हा निर्णय घेतण्यात आला आहे. सोबत प्रथम श्रेणीच्या सगळ्या खेळडूंना कोरोनामुळे सामने न होऊ शकल्यानं योग्य तो मोबदलाही देण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.

२०२१मध्ये आयपीएलचे संघ वाढवणं फार घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल, असं सांगितलं जातंय. त्यामुळेच २०२२पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळवले जाणर आहेत. दहा संघांमध्ये आयपीएल होणार असल्यानं स्पर्धेमधील सामन्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होण्याची शक्यताय.

यजमानपद टिकवण्याचं आवाहन

जागतिक दर्जाच्या स्पर्धेकरिता करसवलतीसाठी आयसीसीने दिलेल्या मुदतीला आता काही दिवस शिल्लक राहिले आहे. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह आणि खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचं कळतंय. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताला टिकवायचे असेल, तर पूर्ण करसवलतीची खात्री द्यावी लागेल, अन्यथा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे. देशातील सध्याच्या कायद्यानुसार क्रीडा स्पर्धाना करसवलत मिळत नाही. यावरच बीसीसीआय सचिव आणि खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचं कळतंय.

म्हणून दोन नव्या संघांना मंजुरी!

दहा संघांचा समावेश झाल्यास, अडीच महिन्यांच्या कालावधीत ९४ सामने खेळवताना आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंची उपलब्धता हाही कळीचा मुद्दा आहे. सोबतच प्रसारणकर्ते प्रत्येक वर्षी ६० सामन्यांसाठी पैसे मोजत असतात. स्टार इंडियाने २०१८-२०२२ या कालावधीसाठी प्रत्येक ६० सामन्यांच्या मोसमाकरिता १६ हजार ३४७ कोटी रुपये मोजलेत. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढल्यास, त्यांच्याशी नव्या कराराबद्दल बोलणी करावी लागेल. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये आठ संघ असतील. २०२२ च्या हंगामात आयपीएलमध्ये दहा संघाचा समावेश असेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!