फुटबॉल स्पर्धेत अयान ब्रदर्स संघ विजयी…

मठ इलेव्हन संघाचा पेनल्टी शूटआउटवर पराभव

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : डिचोली येथील विद्यावर्धक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सेवन ए साईड फुटबाॅल स्पर्धेत अयान ब्रदर्स संघाने विजेतेपदाचा चषक व रोख पाच हजार पाचशे पस्तीस रुपये बक्षीस मिळवले. कारातीची मळी मैदानावर आयोजित स्पर्धेत आयान ब्रदर्सने मठ इलेव्हन संघाचा पेनल्टी शूटआउटवर पराभव करत विजय मिळवला. उपविजेत्या मठ इलेव्हन संघाला रोख तीन हजार तीनशे तेहतीस रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले.
हेही वाचाःGoa Congress | काँग्रेसची नवी टीम गोमंतकीयांसाठी नवी ऊर्जा आणि नवी कल्पना घेऊन येणार : अमित पाटकर

स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला

या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ फुटबॉलपटू नरेश कडकडे, नगराध्यक्ष कुंदन फळारी, विजय सरदेसाई यांनी केले. बक्षीस वितरणास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, विजय सरदेसाई, अभिजित तेली, राजेश धोंड, दिनेश मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.
हेही वाचाः‘सेसा’च्या ४४३ कामगारांवर संकट… 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!