औरंगाबादच्या हॉकीपटू भावंडांचा बुडून मृत्यू

सख्ख्या भावंडांचा  तलावात बुडून  मृत्यू झालाय.

Goan Varta Live | प्रतिनिधी

रोहन रामभाऊ वडमारे (वय २१) व रोहित रामभाऊ वडमारे (वय १७) अशी मृत भावंडांची नावे आहेत.मुकुंदवाडी भागातील रामनगर परिसरातील रहिवासी आहेत , लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगावातल्या तलावात बुडून सोमवारी सायंकाळी युवा हॉकीपटू भावंडांचा मृत्यू झालाय. भावंडांचा मृतदेह मंगळवारी सकाळी हाती लागलाय, त्यानंतर दोघांवरही आजोळ असलेल्या टाकळगावातच अंत्यसंस्कार करण्यात आलाय.

रोहन व रोहित रामभाऊ वडमारे हे दोघेही उत्तम खेळाडू होते . ते राष्ट्रीय व राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले हॉकीपटू होते, असे त्यांचे प्रशिक्षक श्यामसुंदर भालेराव यांनी सांगितलेय.

रोहन, रोहितसह त्यांच्या प्रियंका आणि प्रीती या बहिणीही हॉकीपटू आहेत . यातील मोठय़ा बहिणीने सहा वेळा राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलीये .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!