Asia Cup 2022 : टीम इंडियाचा ‘महिला संघ’ जाहीर…

हरमनप्रीत कौरकडे भारताचे नेतृत्व

Goan Varta Live | प्रतिनिधी

दिल्ली : ‍बांगलादेशमध्ये १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी बुधवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने संघाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवली आहे, तर स्मृती मानधनाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचवेळी भारतीय संघात जेमिमा रॉड्रिग्जचे पुनरागमन झाले आहे. मनगटाच्या दुखापतीतून ती सावरली आहे. दरम्यान, दुखापतीमुळे जेमिमाला इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले होते. जिथे संघ बुधवारी इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळत आहे. पहिला सामना भारताने ७ विकेटने जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे.
हेही वाचा:सर्वच सरकारी खात्यांना सक्तीची निवृत्ती लागू …

तालिबान सत्तेत आल्यापासून एकही महिला संघ नाही

महिला आशिया कप २०२२ स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, युएई आणि थायलंड हे सात संघ आशिया चषकासाठी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. अफगाणिस्तान संघ येणार नाही. कारण तालिबान सत्तेत आल्यापासून तिथे एकही महिला संघ नाही. या भव्य स्पर्धेसाठी भारतीय महिलांचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा:शिक्षण खात्याच्या दुर्लक्षामुळे गावातीलच तरुणाने हाती घेतला ‘खडू, डस्टर’…

बांगलादेशमध्ये पार पडणार स्पर्धा

महिला आशिया कप ही स्पर्धा १ ऑक्टोबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत पार पडणार असून भारत आपला सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत १ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोघेही आमने सामने येणार असून राऊंड रॉबीन पद्धतीने ही टूर्नामेंट पार पडणार आहे. या मालिकेतील सामने हे बांगलादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड १ आणि एसआयसीएस ग्राऊंड २ याठिकाणी पार पडणार आहेत.‍‍‍
हेही वाचा:नागवे-वाळपईत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, बांगलादेशी तरुणाला…

महिला आशिया कपसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस. मेघना, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राधा गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगिरे.
राखीव खेळाडू : तानिया भाटीया, सिमरन दिल बहादूर
हेही वाचा:Crime | कळंगुटमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!