155 किमी प्रतितास वेगाने केली गोलंदाजी आणि येथेच फिरला सामना , उमरान मलिकने दाखवली वेगाची जादू

उमरान मलिक: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात उमरान मलिकने 155 किमी/तास वेगाने गोलंदाजी केली.

ऋषभ | प्रतिनिधी

IND vs SL 1st T20I: IPL 2022 मध्ये आपल्या वेगानं सर्वांना चकित करणारा भारतीय गोलंदाज उमरान मलिकने पुन्हा एकदा आपल्या वेगाची जादू दाखवली. मंगळवारी वानखेडेवर श्रीलंकेविरुद्धच्या T20 सामन्यात त्याने 155 किमी/तास वेगाने गोलंदाजी केली. विशेष म्हणजे या चेंडूवर त्याने महत्त्वाची विकेटही मिळवली.

श्रीलंकेला वानखेडे टी-20 जिंकण्यासाठी 21 चेंडूत 34 धावांची गरज होती आणि लंकेचा कर्णधार दासुन शनाका 26 चेंडूत 45 धावा करत वेगवान फलंदाजी करत होता. इकडे उमरान मलिक आपल्या कोट्यातील शेवटचे षटक टाकत होता. त्याने दासुन शनाकासमोर 155 किमी/तास वेगाने चेंडू टाकला, जो शनाकाला समजू शकला नाही आणि त्याने एक्स्ट्रा कव्हर कडे उभ्या असलेल्या चहल कडे झेल दिला. उमरान मलिकच्या या विकेटमुळे टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन झाले .

हेही वाचाः म्हादईसाठी एकजूट दाखवा    

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!