विराट कोहलीचे दमदार शतक: नवीन वर्षात जुन्या लयीत दिसला किंग कोहली, झळकावले 73 वे शतक, केला “हा” मोठा विक्रमही आपल्या नावावर

विराट कोहलीचे दमदार शतक: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपले 73 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

ऋषभ | प्रतिनिधी

10 जानेवारी 2023 : क्रिकेट | मास्टरकार्ड ट्रॉफी: भारत वी. श्रीलंका | 1 ODI

विराट कोहलीचे शतक: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक झळकावले. याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते. या शतकाच्या माध्यमातून त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

हे विक्रम आपल्या नावावर केले 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12500 धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याने वनडे कारकिर्दीतील ४५ वे शतक झळकावले. त्याचवेळी घरच्या मैदानावर त्याचे हे 20 वे आंतरराष्ट्रीय शतक होते. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावणारा कोहली हा दुसरा फलंदाज आहे. त्याच्यासाठी 2023 वर्षाची सुरुवात चांगली झाली. वर्षातील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावले. 

रोहित शर्माही चांगलाच लयीत दिसला

या सामन्यात विराट कोहलीशिवाय रोहित शर्माने भारताकडून शानदार खेळी केली. त्याने 67 चेंडूत 83 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रोहितने संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याच्यासोबत आलेला शुभमन गिलही 70 धावांची इनिंग खेळून माघारी परतला.

मिम्स देखील क्षणात वायरल झाले

 

कोहलीसाठी 10 नंबर लकी ठरला

आज 10 तारखेला कोहलीने त्याचे 45 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातही त्याने ODI कारकिर्दीतील 44 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. योगायोग म्हणजे तो सामना 10 डिसेंबर 2022 रोजी खेळला गेला होता आणि हा सामना 10 जानेवारीला खेळवला जात आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!