विंडीज वि. भारत पहिली कसोटी | आश्विन-जाडेजाने तोडला मॅकग्रा-गिलेस्पीचा ‘हा’ विक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 13 जुलै | भारतीय फिरकी जोडी रवी अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात 486 बळी घेतले आहेत. आता रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जोडीच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पी यांना मागे टाकले आहे. आता भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन जोडीला मागे टाकले आहे. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात 468 बळी घेतले आहेत.

आश्विन-जाडेजा या जोडगोळीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला
रवी अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीत ५ बळी घेतले होते. तर रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने 8 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रवी अश्विनने कसोटीत ३३व्यांदा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. तसेच या ऑफस्पिनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळींचा आकडा पार केला.

ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पी या ऑस्ट्रेलियन जोडीला मागे सोडले
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन जोडी ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पीच्या नावावर होता. पण आता रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी पुढे गेली आहे. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीमुळे मीझान वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांवर गारद झाला. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना 1-1 यश मिळाले.

आश्विनचा असाही एक विक्रम
या विक्रमासोबतच आश्विनने अजून एका विक्रमास गवसणी घातलीये. वडील आणि मुलगा या दोघांनाही बाद करणारा आश्विन पहिला गोलंदाज आहे. 2011 मध्ये भारतात खेळवल्या गेलेल्या एका कसोटीत आश्विनने विंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनरेन चंद्रपॉल यांना LBW ने बाद केले होते. तर डॉमिनिका येथील कसोटीत चंद्रपॉल याचा मुलगा तेगनरेन चंद्रपॉल यासही बाद केले आहे.