MASTERCARD TROPHY | INDIA VS AUSTRELIA : एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, या 3 स्टार खेळाडूंचे संघात दमदार पुनरागमन
भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. काहीही असो, यावेळी एकदिवसीय सामन्यांची मालिका खुमासदार होतळ हयात काही शंका नसावी

ऋषभ | प्रतिनिधी
IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघ सध्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची आधीच निवड झाली आहे. आता या हाय व्होल्टेज मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
16 खेळाडूंच्या संघाची घोषणा
तीन एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाने अशा अनेक खेळाडूंना परत केले आहे, जे दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होते. या मालिकेसाठी ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि झाय रिचर्डसन हे घातक फलंदाज पुन्हा एकदा संघात परतले आहेत. संघाची कमान पॅट कमिन्सकडे आहे. त्याचबरोबर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे शेवटचे दोन सामने सोडून मायदेशी परतलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या नावाचाही या संघात समावेश आहे.
हेही वाचाः विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज!
स्टार खेळाडूंनी संघ सजला आहे
एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक स्टार खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. या मालिकेत कॅमेरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉइनिससारखे खेळाडू भारताविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन यांसारखे बलाढ्य फलंदाजही संघात आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ:
पॅट कमिन्स (क), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झ्ये रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा