आयपीएल लिलाव 2023: निकोलस पूरन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा कॅरेबियन खेळाडू , लखनऊने 16 कोटींना विकत घेतले

आयपीएल लिलाव 2023: निकोलस पूरन गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून 10.75 कोटी रुपयांच्या किमतीत खेळला, परंतु एका हंगामानंतर हैदराबादने त्याला डच्चू दिला होता. एकंदरीत पूरनसाठी लावलेली बोली म्हणजे "अंदाज पंचे दाहो-दरशे" अशीच आहे 

ऋषभ | प्रतिनिधी

आयपीएल लिलाव 2023: वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) इतिहासातील पाचवा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पूरनला लखनऊ सुपरजायंट्सने 16 कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीत सामील केले आहे. पूरन गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून १०.७५ कोटी रुपये किमतीत खेळला होता, पण हैदराबादने त्याला एका हंगामानंतर डच्चू दिल होता . पूरन काही काळापासून सतत संघर्ष करत आहे, त्यामुळे त्याला एवढी मोठी किंमत मिळण्याची अपेक्षा फार कमी लोकांना होती.

पूरन हा लीग इतिहासातील सर्वात महागडा कॅरिबियन खेळाडू ठरला आहे

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने पुरण विकत घेण्यासाठी सुरुवातीला लढा दिला

बोली सात कोटींच्या पुढे गेल्यावर लखनौने एंट्री घेतली आणि त्यानंतर ती कायम राहिली. दिल्ली आणि लखनऊ यांच्यातील लढत शेवटपर्यंत सुरू राहिली आणि अखेरीस लखनऊने 16 कोटींची बोली लावून पुरणला करारबद्ध केले. पूरन हा लीग इतिहासातील पाचवा सर्वात महागडा खेळाडू आणि एकूणच सर्वात महागडा कॅरिबियन खेळाडू ठरला आहे.

पुरणची आतापर्यंतची कारकीर्द अशी होती

पूरनला 2017 मध्येच मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले होते, परंतु त्याला 2019 मध्ये पंजाब किंग्सने पदार्पण करण्याची संधी दिली होती. पूरन पंजाबकडून सलग तीन हंगाम खेळला. पहिल्या सत्रात सात सामन्यांमध्ये 168 धावा आणि दुसऱ्या सत्रात 14 सामन्यात 353 धावा केल्यानंतर पूरनने तिसऱ्या सत्रात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. पूरनने 2021 मध्ये 12 सामन्यांमध्ये आठपेक्षा कमी सरासरीने केवळ 85 धावा केल्या. यानंतर पंजाबने त्याला सोडले आणि 2022 मध्ये त्याने हैदराबादसाठी 14 सामन्यांत 306 धावा केल्या. एकंदरीत पूरन साठी लावलेली बोली म्हणजे “अंदाज पंचे दाहो-दरशे” अशीच आहे

आता लखनऊने खेळलेला डाव कितपत यशस्वी होतोय हे येणाऱ्या सीझनमध्येच समजेल.

हेही वाचाः उत्तरेत ८७.२६ टक्के, दक्षिणेत ८६.५० टक्के गुन्ह्यांचा यशस्वी छडा!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!