आयएसएलचे संपूर्ण सत्र गोव्यातच होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी :इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२०-२१च्या संपूर्ण सत्राचे आयोजन गोव्यात होणार आहे. ही स्पर्धा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून स्पर्धेतील सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवण्यात येणार आहेत. सर्व सामने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फातोर्डा, जीएमसी अॅथलेटिक स्टेडियम, बांबोळी व टिळक मैदान, वास्को येथे खेळवण्यात येतील.

फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलोपमेंट लिमीटेडच्या संस्थापक व अध्यक्ष निता अंबानी यांनी सांगितले, आयएसएलचे अखेरचे सत्र ज्या ठिकाणी संपले त्या गोव्यातून आयएसएलचे सातवे सत्र सुरू करण्यास आम्हाला आनंद होत आहे. गोव्यातील फुटबॉल प्रेमींचे अभिनंदन. गोवा पुन्हा एकदा भारतातील फुटबॉलचे मध्यवर्ती केंद्र बनत आहे.

गेल्या सहा वर्षांत आयएसएलने भारतीय फुटबॉलला जागतिक क्षेत्रात आपले योग्य स्थान मिळविण्यात मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या अल्पावधीतच आम्ही अनेक उल्लेखनीय टप्पे पार केले आहेत. आयएसएलची अलीकडील वर्ल्ड लीग फोरमची सदस्यता, सिटी फुटबॉल समूहाची मुंबई सिटी एफसीमधील गुंतवणूक, एटीकेचे मोहन बागानबरोबर विलिनीकरण आणि आयएसएलची सोशल मीडियावरील चौथी सर्वाधिक लोकप्रिय लीग म्हणून ओळख. दशलक्ष चाहते संवाद, हे सर्व भारतीय फुटबॉलच्या अभूतपूर्व उदयास सूचक आहेत, असे अंबानी यांनी सांगितले.

फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलोपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) गोवा क्रीडा प्राधिकरण, गोवा फुटबॉल असोसिएशन व राज्यातील प्रशासनासोबत आयएसएलचे सुरक्षित आयोजन करण्यासाठी काम करत आहे. करोना या महामारीचा या स्पर्धेवर परिणाम होता नये यासाठी सर्वजण ​मिळून काम करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!