काय आहे ‘फादर्स डे’चा इतिहास

भारतामध्ये १० व्या दशकापासून ‘फादर्स डे’ची सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः वास्तविक ‘फादर्स डे’ हा जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. कॅथलिक युरोपमध्ये मध्ययुगात १९ मार्चला सेंट जोसेफच्या नावाने (येशू ख्रिस्ताचं पालनपोषण करणारे त्याचे पिता) फादर्स डे साजरा होत असे. त्यानंतर हा दिवस अमेरिकेत स्पेन आणि पौतुगालद्वारे आणण्यात आला.

भारतामध्ये १० व्या दशकापासून ‘फादर्स डे’ची सुरुवात

यापूर्वी १० व्या शतकापर्यंत अमेरिकेतील केवळ कॅथलिक धर्मातच ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येत असे. त्यानंतर मात्र ‘मदर्स डे’प्रमाणे जे वडील आपल्या मुलांना वाढवतात त्यांच्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. भारतामध्ये १० व्या दशकापासून याची सुरुवात झाली. ‘आर्चिस’ या ग्रिटींग कार्डसारख्या दुकानांचं आगमन भारतात झालं आणि त्यानंतर भारतातही हा दिवस साजरा व्हायला लागला. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ‘फादर्स डे’चंही महत्व वाढलं आहे. पाशात्य देशात जीवित वडिलांना या दिवशी लाल गुलाब, तर मृत पित्यांना सफेद गुलाब देण्यात येतं.

पितृत्वाचं महत्त्व

आपण लहानपणापासूनच आईचं महात्म्य नेहमीच ऐकत आलोत. पण वडिलांचं कौतुक फारच कमी ठिकाणी होताना दिसतं. खरं तर बऱ्याच ठिकाणी आईप्रमाणेच वडिलांचंही तितकंच महत्व असतं. काही ठिकाणी तर मुलं आईपेक्षाही वडिलांच्या जास्त जवळची असतात. मुलांच्या जन्मापासून ते मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी न सांगता राबणारा तो बापच असतो. पण वडिलांचं कौतुक सहसा समोर येत नाही. भारतीय परंपरेनुसार जेव्हा उठल्यावर सूर्याला नमस्कार केला जातो, तेव्हाच तो नमस्कार आपल्या वडिलांनाही पोहचतो असं म्हटलं जातं. अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या आयुष्यात पित्याचं महत्व बदलत असतं. पण जितकी महत्त्वाची आई असते तितकंच महत्त्व पितृत्वाचंही असतं. वडिलांचं प्रेम हे प्रत्येक मुलाच्या आयुष्यात तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे वडिलांना आपलंसं करणं आणि त्यांना जपणंही गरजेचं आहे. एकदा हा आधार हरवला की, कितीही वाटलं तरीही ते परत येणं शक्य नसतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!