WhatsAppचं एक पाऊल मागे! स्टेटस ठेवून उलगडल्या अनेक बाबी

प्रायव्हसी पॉलिसीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअप चर्चेत

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे व्हॉट्सअपनं नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी मुदतवाढ दिलेली असतानाच आता आणखी एक नवी बाब समोर आली आहे. व्हॉट्सअपने स्टेटस ठेवून नव्या प्रायव्हसी पॉलिसी संबंधित गोष्टींबाबत स्पष्टता दिली आहे. फेसबुकसोबत डेटा शेअर करणार नसल्याचं व्हॉट्सअपने म्हटलंय. तसंच खासगी डेटा आणि चॅटबद्दल पूर्णपणे सुरक्षितता बाळगण्यात येत असल्याचाही दावा व्हॉट्सअपकडून करण्यात आला आहे. युजर्सच्या प्रायव्हसीबद्दल कटीबद्ध असल्याचं म्हटलं व्हॉट्सअपने एक पाऊल मागे घेतलंय. अनेस युजर्स सिग्नल आणि टेलिग्रामकडे वळत असल्यानं व्हॉट्सअपनं सावध पवित्रा घेतलाय.

रविवारी सकाळी जेव्हा युजर्सनी व्हॉट्सप वापरालाय घेतलं, तेव्हा त्यांना व्हॉट्सअपचा एक स्टेटस दिस होता. यामध्ये प्रायव्हसी पॉलिसीबाबत महत्त्वाचा संदेश देण्यात आला होता. त्यातला पहिला मेसेज होता तो प्रायव्हसी बद्दलचा. तीपैकी पहिल्या फोटोतून व्हॉट्सअपने एन्ड-टू-एन्ड एन्क्रीप्टबाबतची गोष्ट नमूद करताना तुम्ही करत असलेलं चॅट पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला. तुमचं चॅट कुणीची वाचू शकत नाही आणि पाहूही शकत नाही, असा दावा यातून करण्यात आला.

तर दुसऱ्या मेसेजमध्ये तुम्ही शेअर केलेलं लोकेशनही कुणी पाहत नसल्याचं व्हॉट्सअपनं म्हटलंय.

तिसऱ्या मेसेजमध्ये व्हॉट्सअपने युजर्सचा डेटा, जसं की कॉन्टॅक्स किंवा इतर गोष्टी फेसबुकसोबत शेअर करत नसल्याचा दावा केलाय.

बापरे! कोरोनाची लस दिल्यानंतर 29 जण दगावले! कुठे?

दरम्यान, व्हॉट्सअपकडून ट्वीटही जारी करण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याबाबत मुदतवाढ दिली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की ८ फेब्रुवारीला कुणाचंही व्हॉट्सअप अकाऊंट डिलीट होणार नाहीये. तसंच आम्ही पूर्णपणे युजर्सच्या प्रायव्हसीबद्दल कटीबद्ध राहणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केलाय.

काय आहे नवी प्रायव्हसी पॉलिसी?

नवीन अपडेटमध्ये असं म्हटलंय की, ‘व्हॉट्सअ‍ॅप आपले नियम आणि गोपनीयता धोरण (Privacy Policy) अपडेट करतंय. मुख्य अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा, डेटावर प्रक्रिया कशी करावी, इतर फेसबुक सेवांच्या व्हॉट्सऍप चॅट्सचं स्टोअरेज आणि मॅनेजमेन्ट कसं करावं आणि व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकसह फेसबुक कंपनीच्या उत्पादनांमध्ये कसं इंटिग्रेट होईल याविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.

नवीन पॉलिसीचा अर्थ असा आहे की आपल्याकडे व्हॉट्सऍपवर कोणताही डेटा आहे, तो आता इतर फेसबुक कंपन्यांसह देखील शेअर केला जाईल. या डेटामध्ये तुमचं लोकेशन, आयपी पत्ता, टाइम झोन, फोन मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टम, बॅटरी पातळी, सिग्नल सामर्थ्य, ब्राउझर, मोबाइल नेटवर्क, आयएसपी, भाषा, वेळ क्षेत्र आणि आयएमईआय क्रमांक समाविष्ट आहे. फक्त हेच नाही, आपण संदेश किंवा कॉल कसा कराल, कोणते गट कनेक्ट केलेले आहेत, आपली स्थिती, प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीनही शेअर केलं जाईल. याचाच अर्थ व्हॉट्सअप वापरणाऱ्यांवर पूर्णपणे सर्विलन्स ठेवता येऊ शकेल, असाही दावा केला जातोय.

हेही वाचा – WhatsApp ला नवीन पर्याय ‘हा’ असू शकतो?

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Tech Varta | तुमचा फोन स्लो किंवा हँग होतोय का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!