खासगी डेटा वाचवण्यासाठी WhatsApp डिलीट करणं, हाच एकमेव मार्ग उरलाय?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : व्हॉट्सऍप कोण नाही वापरत? सगळेच वापरतात. पण याच व्हॉट्सअपबाबत आता एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. व्हॉट्सऍप वापरल्यामुळे तुमच्या फोनमधील सगळा डेटा फेसबुककडे जाईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे व्हॉट्सऍप वापरत राहायचं की बंद करुन टाकायचं, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
का पडला असा प्रश्न?
इन्स्टंट मेसेजिंग App व्हॉट्सऍप नवीन डेटा प्रायव्हसी नियम आणतंय.. त्यानंतर व्हॉट्सऍपवर जगभरातून टीका होतेय. नव्या अपडेटनुसार व्हॉट्सऍप अन्य फेसबुक कंपन्यांसमवेत युजरचा डेटा शेअर करणार आहे. नव्या पॉलिसीप्रमाणे व्हॉट्सऍपची सेवा सुरू ठेवण्यासाठी, युजर्सना 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत नवीन डेटा पॉलिसी स्वीकारावी लागणार आहे. जर तसं केलं नाही तर एक तर ऍप चालणार नाही. किंवा मग युजर्सना व्हॉट्सऍप डिलीट करुन दुसऱ्या कोणत्यातरी एका ऍपवर शिफ्ट व्हावं लागेल. तर मग जाणून घेऊया व्हॉट्सऍपचं नवीन धोरण काय आहे आणि आता आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
Well, Whatsapp let me tell you I’m gonna ditch you🤷♀️ and will be becoming a loyal telegram user…
— Pradikta (@Pradikta9) January 9, 2021
Also Hoping!! telegram won’t be like you in future though.#Telegram#WhatsAppPrivacyPolicy pic.twitter.com/M35NTF1aOf
नव्या अपडेटमध्ये काय?
नवीन अपडेटमध्ये असं म्हटलंय की, ‘व्हॉट्सअॅप आपले नियम आणि गोपनीयता धोरण (Privacy Policy) अपडेट करतंय. मुख्य अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपची सेवा, डेटावर प्रक्रिया कशी करावी, इतर फेसबुक सेवांच्या व्हॉट्सऍप चॅट्सचं स्टोअरेज आणि मॅनेजमेन्ट कसं करावं आणि व्हॉट्सअॅप फेसबुकसह फेसबुक कंपनीच्या उत्पादनांमध्ये कसं इंटिग्रेट होईल याविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे. ‘
हेही वाचा – गोव्यात मोबाईल नेटवर्कची क्षमता वाढवण्यासंबंधी मोठा निर्णय
यात पुढे असे लिहिले आहे की, ‘AGREE’ वर टॅप करून आपण 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू असलेल्या नवीन अटी आणि गोपनीयता धोरण (Privacy Policy) स्वीकारत आहात. आपण आपले खातं हटवू इच्छित असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास हेल्प सेंटरवर जाऊ शकता.
हेही वाचा – Tech Varta | १० हजारांपासून २० हजारपर्यंतचा मस्त फोन
नवीन धोरणाचा अर्थ काय? टोटल सर्विलन्स
नवीन पॉलिसीचा अर्थ असा आहे की आपल्याकडे व्हॉट्सऍपवर कोणताही डेटा आहे, तो आता इतर फेसबुक कंपन्यांसह देखील शेअर केला जाईल. या डेटामध्ये तुमचं लोकेशन, आयपी पत्ता, टाइम झोन, फोन मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टम, बॅटरी पातळी, सिग्नल सामर्थ्य, ब्राउझर, मोबाइल नेटवर्क, आयएसपी, भाषा, वेळ क्षेत्र आणि आयएमईआय क्रमांक समाविष्ट आहे. फक्त हेच नाही, आपण संदेश किंवा कॉल कसा कराल, कोणते गट कनेक्ट केलेले आहेत, आपली स्थिती, प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीनही शेअर केलं जाईल. याचाच अर्थ व्हॉट्सअप वापरणाऱ्यांवर पूर्णपणे सर्विलन्स ठेवता येऊ शकेल, असाही दावा केला जातोय.
Whatsapp’s new privacy policy be like:#WhatsAppPrivacyPolicy pic.twitter.com/H6IKh7M1nd
— miral_asif (@miral_asif) January 9, 2021
हा डेटा विश्लेषणाच्या उद्देशाने वापरला जाईल असं कंपनीचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा की, फेसबुकला पूर्वीपेक्षा जास्त डेटामध्ये एक्सेस करता येईल आणि फेसबुकच्या इतर कंपन्यांना हा डेटा शेअरही केला जाईल. ज्या युगात डेटा उपयुक्त वस्तू बनला आहे, तो शेअर करुन, फेसबुक आणि त्याच्या कंपन्यांना मोठा नफा मिळवायचा आहे, असा याचा स्पष्ट अर्थ मानला जातोय.
हेही वाचा – डायरेक्ट चंद्रार फेम एमजेच्या भावानं लिहिलेलं पत्र प्रत्येकानं वाचलंच पाहिजे!
व्हॉट्सअॅप डिलीट केल्याने फायदा होईल ?
आपण आपला डेटा शेअर करू इच्छित नसल्यास आपण फोनवरून अॅप बंद करण्याचाही पर्याय निवडू शकता. याचा अर्थ असा नाही की आपण स्टोअर केलेला सर्व डेटा त्वरित डिलीट केला जाईल. व्हॉट्सऍपच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा जेव्हा एखादे अकाऊंट डिलीट केलं होतं. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की तयार केलेल्या ग्रूपबाबतची माहिती किंवा इतर लोकांशी मारलेल्या तुमच्या गप्पांचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.’
After new #WhatsAppPrivacyPolicy 😅 @WhatsApp pic.twitter.com/n1uPtdk0lQ
— Pankkkkaj (@pankkkkaj) January 9, 2021
शेवटचा मार्ग कोणता?
व्हॉट्सअपने तयाप केलेली नवी प्रायव्हसी पॉलिसी ८ हजार शब्दांपेक्षाही जास्त लांबलचक आणि कायदेशीर शब्दांनी खच्चून भरलेली अशी आहे. या पॉलिसीमधले बरेचशे शब्द सामान्य माणसाला सहज समजत नाहीत. अशा परिस्थितीत व्हॉट्सअप जर तुमचा सगळा डेटा एक्सेस करु शकतंय, अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही सिंग्नल मॅसेंजरसारखं दुसरं एखादं ऍप वापरणं जास्त चांगलं, असंच म्हणावं लागेल. आणि व्हॉट्सऍपला अखेरचा निरोप देणंच योग्य ठरेल, अशीही चर्चा सुरु झाली आहे.
Mark Zuckerberg after seeing people switch to Signal and Telegram:#WhatsAppPrivacyPolicy pic.twitter.com/RWsqVmwrh2
— Brown Girl ✨ (@the_desi_dream) January 9, 2021
ही फेसबूक पोस्टही वाचा –
व्हॉट्सऍप डिलीट करावं का? – प्रसाद शिरगावकर “व्हॉट्सऍप आता आपला डेटा प्रचंड मोठ्या प्रमाणात चोरून फेसबुकला देणार आहे….
Posted by Prasad Shirgaonkar on Saturday, 9 January 2021
पाहा व्हिडीओ – Tech Varta | तुमचा फोन स्लो किंवा हँग होतोय का? हे आहे औषध