आलं रे आलं… WhatsApp नवं फिचर आलं! नव्या फिचरमुळे होणार ‘हा’ फायदा

नव्या फिचरचं नाव आहे डिसएपिअरिंग मेसेज

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : WhatsApp वापरत नाही, असा माणूस हल्ली क्वचितच सापडतो. त्यामुळेही आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत, ती सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. कारण WhatsAppने नवं फिचर आणलंय. या नव्या फिचरमुळे WhatsApp वापरताना आता कसा फायदा होणार, हे तुम्हाला कळू शकणार आहे.

काय आहे फिचर?

WhatsAppने नवं फिचर लॉन्च केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या फिचरची चर्चा सुरु होती. या फिचरचं नाव आहे. डीसएपिअरिंग मेसेजेस. (‘Disappearing Messages’) म्हणजे मेसेज गायब करणं. नेमकं हे फिचर कसं काम करणार आणि हे फिचर वापरायचं कसं त्याबद्दल जाणून घेऊयात जरा सविस्तरपणे…

कसं आहे फिचर? बरं-वाईट?

WhatsAppचं नवं फिचर वापरण्यासाठी तुम्हाला WhatsApp अपडेट करावं लागेल. त्यासाठी प्लेस्टोर किंवा एपस्टोअरमध्ये जाऊन WhatsApp अपडेट केल्यानंतर हे फिचर वापरता येऊ शकेल. या फिचरमुळे एक नवी सुविधा WhatsApp युजर्सला मिळणार आहे. अनेकदा जुने जुने मेसेजेसही आपल्या WhatsAppवर तसेच पडून असतात, ज्यांचा आपल्याला तसा काहीच उपयोग नसतो. मात्र आता जे नवं फिचर आलं आहे, त्याचा उपयोग याच कामासाठी होणार आहे.

या नव्या फिचरमुळे आपल्या WhatsAppवर असलेले सात दिवस जुने मेसेज आपल्याप डिसएपिअर करता येणार आहेत. अर्थात त्यासाठी हे फिचर आपल्या फोनमध्ये आल्यानंतर इनेबल करावं लागेल. त्यानंतर आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. अन्यथा हे फिचर डिजेबलही करता येणं शक्य आहे.

कुठे कुठे होणार फायदा?

या नव्या फिचरचा उपयोग पर्सनल चॅटसोबतचच ग्रूप चॅटमध्येही होणार आहे. काही ठराविक लोकांचे चॅट जर तुम्हाला कायमस्वरुपी राहावेत असं वाटत असेल, तर तसंही करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रूप चॅटसोबतच पर्सनल चॅटींग करतानाही आता युजर्न्सला या फिचरचा उपयोग होईल.

याआधी लोकांना डेटा फुल्ल होत असल्यानं संपूर्ण चॅट लिस्ट क्लिअर किंवा डिलीट करावी लागत होती. मात्र यापुढे ती डोकेदुखी कायमची दूर होण्याची शक्यता आहे. WhatsAppच्या नव्या फिचरमुळे अनेकांना दिलासा मिळण्याची शक्यताय. ऑन-ऑफ असं करता येणार असल्यानं प्रत्येकाला आपल्या गरजेप्रमाणे हे फिचर वापरता येणार आहे.

कुठून आलं फिचर?

WhatsAppने आणलेलं हे फिचर काही पहिल्यांदाच बाजारात आलेलं नाही. याआधी स्नॅपचॅट, टेलिग्राम यावरही असं फिचर होतं. मात्र या एप्सच्या तुलनेत WhatsAppने आणलेलं फिचर जास्त उपयोगी येईल, असं जाणकार सांगतात. अजूनपर्यंत तुम्ही हे फिचर वापरुन पाहिलं नसेल.. तर आताच वापरून पाहा..आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवायला विसरु नका.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!