WhatsApp वर आला Disappearing Messages पर्याय

जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरबद्दल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आता तुमच्या फोनमधुन नको असलेले मेसेजीस आपोआप गायब होतील. व्हॉट्सअ‍ॅपने डिसअपेरिंग मेसेजचे फिचर वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलीये.भारतीय युझर्सला आता व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर हे फिचर वापरता येणारे. अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएस, डेस्कटॉप, कियाओएस आणि वेब व्हर्जनवर अपडेटचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलाय. यापुर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप पे, ऑलवेज म्यूट आणि एनहान्स स्टोरेज टूलचे पर्याय उपलब्ध करुन दिलेले. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ब्लॉगवर या फिचरची घोषणा केलीये.

“व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज अनेकदा आपल्या फोनवर कायमचे राहतात. कुटुंबाकडून आणि मित्रांकडून आलेले मेसेज हे आठवणी म्हणून छान आहेत. मात्र यापैकी सर्वच मेसेज जपून टेवण्यासारखे नसतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काम करताना आमचा हा हेतू आहे की येथील संवाद हे तुम्हाला अधिक जवळचे वाटावेत. म्हणजेच सर्वच मेसेज तुमच्याकडे कायमचेच राहू नयेत असा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी डिसअपेरिंग मेसेजचा नवीन पर्याय घेऊन आलो,” असं व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलंय.

डिसअपेरिंग मेसेज हे ऐच्छिक फिचर असणारे. हे फिचर ऑन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरील मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील. विशेष म्हणजे हे फिचर एखाद्या व्यक्तीसाठी किंवा ग्रुपसाठी ऑन करण्याची सुविधा उपलब्ध असणारे. हे फिचर ऑन केल्यानं मेसेज जपून ठेवण्यासाठी तो कॉपी पेस्ट करणे किंवा स्क्रीनशॉर्ट काढणे असे दोन पर्याय युझर्सकडे उपलब्ध असतील.

“प्रॅक्टीकली विचार केला तर संवाद हे कायम जपून ठेवण्यासाठी नसतात. मात्र त्याचवेळी आपले खास मेसेज जपून ठेवायला हवेत, असं आमचं मत असल्याने आम्ही सुरुवातीतील सात दिवसांच्या कालावधीसाठी हे फिचर सुरु करत आहोत. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी तुम्हाला पाठवण्यात आलेले मेसेजीस, जे महत्वाचे नाहित तुमच्या चॅटमध्ये ते काही दिवस राहील आणि त्यानंतर आपोआप गायब होतील,” असं ही व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे.

  • व्हॉट्सअ‍ॅप डिसअपेरिंग मेसेजचं फिचर सुरु कसं करायचं?
  • आधी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन अपडेट करुन घ्या. हे तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन अपडेट करता येईल.
  • अ‍ॅप अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडो ओपन करा
  • त्यानंतर कॉनटॅक्ट नेमवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डिसअपेरिंग मेसेजचे फिचर ऑन करण्याचा पर्याय दिसेल.
  • तुम्ही येथे डिसअपेरिंग मेसेज पर्याय सिलेक्ट केल्यास हे फिचर काम करु लागले.

सर्व प्लॅटफॉर्मवर म्हणजेच अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएस, डेस्कटॉप, कियाओएस आणि वेब व्हर्जनवर हा पर्याय उपलब्ध असून, तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा ग्रुपसाठी हे फिचर ऑन केल्यावर त्यासंदर्भातील नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाईल. डिसअपेरिंग मेसेज तुम्ही फॉरवर्ड केल्यानंतर तो पुढील सात दिवस दिसत राहील. डिसअपेरिंग मेसेज हा जर फोटो किंवा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असेल आणि तुम्ही ऑटो डाऊनलोडचा पर्याय सुरु ठेवला असेल तर ते ऑटोमॅटिकली गॅलरीमध्ये सेव्ह होईल.

“तुम्हाला चॅटवर येणाऱ्या मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतील. डिसअपेरिंग मेसेज पर्याय वापरल्यास चॅटमधील मीडिया फाइल्सही आपोआप गायब होतील. मात्र ऑटो डाउनलोड पर्याय सुरु असेल तर डाऊनलोड झालेले फोटो हे मोबाईलमध्ये सेव्ह राहतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!