TECHNO VARTA : Motorola ने लॉन्च केला Moto G73 5G, जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्ये आणि बुकिंगची तारीख

Motorola ने भारतात आणखी एक 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Moto G73 5G हा बजेट सेगमेंटचा स्मार्टफोन आहे, पण तो इतर ब्रँडला टक्कर देऊ शकेल की नाही, हे येणाऱ्या काळातच कळेल. यामध्ये कंपनीने ग्राहकांना आवश्यक ते सर्व फिचर्स दिले आहेत.त्याच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

moto g73 5g smartphone launched in india check price specs motorola new  mobile 2023 | भारत में लॉन्च हुआ Moto G73 5G स्मार्टफोन, जानें कीमत और  फीचर्स | Hari Bhoomi

Moto G73 5g भारतात लॉन्च: Motorola ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Moto G73 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेपूर्वी युरोपियन बाजारात लॉन्च केला होता. Moto G73 मध्ये MediaTek Dimensity 930 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हा प्रोसेसर असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. यासोबतच हा स्मार्टफोन 30W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्ये 

Moto G73 5Gचे स्पेक्स

Moto G73 5G मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये 120Hz सपोर्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे जे 1 TB पर्यंत वाढवता येते. हा 5G फोन MediaTek Dimensity 930 चिपसेट सह येतो.

Motorola Moto G73 Price in India 2023, Full Specs & Review | Smartprix

Moto G73 5G कॅमेरा वैशिष्ट्ये

Moto G73 5G च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे, ज्याचे अपर्चर 1.8 आहे. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. त्याचा फ्रंट 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, ज्यामध्ये अपर्चर f/2.4 आहे. Motorola ने कनेक्टिव्हिटी साठी जवळपास सर्व पर्याय दिले आहेत. यात वायफायसह 5G, ब्लूटूथ 5.3, GPS-AGPS, NFC, USB टाइप C पोर्ट आणि 3.5mm जॅक देखील आहे. 

Telefon mobil Motorola Moto g73, Dual SIM, 8GB RAM, 256GB 5G, Midnight Blue  - eMAG.ro

मेमरी, बुकिंगची तारीख आणि ऑफर

Moto G73 5G च्या 8GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही 16 मार्चपासून फ्लिपकार्टवर बुक करू शकता. तुम्ही Axis, HDFC, ICICI आणि SBI कार्ड वापरून खरेदी करत असाल तर तुम्हाला नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळेल. हा फोन ल्युसेंट व्हाइट आणि मिडनाईट ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. 

Moto G73 5G launch on March 10? Check specifications and expected price |  Mint
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!