TECHNO VARTA : मग ठरलं ! या दिवशी होणार IQOO Z7 5G लॉंच; हा फोन ठरेल का VALUE FOR MONEY ? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

iQOO लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन 5G स्मार्टफोन असेल. iQOO z7 थेट Motorola Moto G73 आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G शी स्पर्धा करेल. कंपनीने याच्या मागील बाजूस 64-मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

iQOO Z7 5G price in India, configurations, colour variants tipped before  March 21st launch - Pricebaba.com Daily

iQOO Z7 5G लाँचची तारीख : IQOO लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन iQOO Z7 लॉन्च करणार आहे. कंपनी भारतात 21 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजता iQOO Z7 5G लाँच करेल. लॉन्च होण्यापूर्वीच किंमत आणि फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. लीकवर विश्वास ठेवला तर हा 5G स्मार्टफोन 20 ते 25 हजारांच्या किंमतीच्या सेगमेंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. परंतु, या किंमतीत आणि या श्रेणीत IQOO Z7 खरोखरच न्याय्य ठरणार की नाही हे पाहणे बाकी आहे.

कंपनी ज्या किंमतीत iQOO Z7 5G बाजारात लॉन्च करण्याची योजना आखत आहे, त्यामध्ये कंपनीला कठीण स्पर्धा होणार आहे कारण या सेगमेंटमध्ये आधीपासूनच Xiaomi, Realme, Vivo आणि Oppo यांचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आयक्यूओच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांसाठी काय खास असणार आहे, जे इतर ब्रँडच्या तुलनेत अधिक मजबूत असल्याचे सिद्ध करेल.

iQOO Z7 5G launch date likely to set for 21st march in India –  PassionateGeekz

ही iQOO Z7 5G ची किंमत असेल

iQOO भारतात iQOO Z7 25 हजारांच्या किमतीच्या रेंजमध्ये लाँच करू शकते . त्याचे लोअर व्हेरिएंट सुमारे 20 हजार रुपयांना मिळू शकते. लीकवर विश्वास ठेवला तर, iQOO Z7 5G सोबत, कंपनी iQOO Z7 Pro 5G बाजारात लॉन्च करू शकते. 

iQOO Z7 Series - Official Launch | Specs | Price in india | iQOO Z7 Pro  Unboxing - YouTube

 iQOO Z7 5G चे स्पेक्स

  1. iQOO Z7 5G मध्ये Mediatek Dimensity 920 5G चिपसेट देण्यात आला आहे, जो 5G स्मार्टफोन आहे. 
  2. iQOO Z7 मध्ये AMOLED स्क्रीन आहे ज्याचा आकार 6.3 इंच आहे. कंपनीने त्यात फक्त 90 Hz चा रिफ्रेश दर दिला. या किमतीच्या श्रेणीमध्ये 120 Hz उपलब्ध असती, तर अधिक चांगला स्मूथ अनुभव उपलब्ध झाला असता. 
  3. iQOO Z7 चा फक्त 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. यात 12 जीबी रॅमचा व्हेरिएंट देखील असेल. 
  4. iQOO Z7 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे, परंतु त्याची गुणवत्ता कशी असेल, याविषयी तो वापरल्यानंतरच सांगता येईल. 
iQOO Z7 5G Price in India 2023, Full Specs & Review | Smartprix

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!