TATAची NEXON EV एकदा चार्ज केल्यावर खरंच 312 Km चालते?

पेट्रोल-डिझेलमुळे अनेकांची सध्या इलेक्ट्रीक कारला पसंती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पेट्रोलने राज्यात शंभरी गाठली आहे. गोव्यासोबत अनेक राज्यात पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. अशावेळी आता अनेक जण हे पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांऐवजी इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करु लागले आहेत. दरम्यान, सध्याच्या घडीला टाटाची नेक्सन ईव्हीने बाजारात धुमाकूळ घातलाय. इलेक्ट्रीक कारच्या सेगमेन्टमध्ये सध्या गोव्यातही टाटाची नेक्सन ईव्ही दिसायला सुरुवात झाली आहे. पणजीतील अनेक रस्त्यांवर सध्या हिरव्या रंगाच्या नंबर प्लेटच्या नेक्सन ईव्ही वावरत असल्याचं दिसून आलंय.

त्यामुळे पेट्रोल-डिझेल गाड्या चालवणारे अनेक जण आता इलेक्ट्रीक कार घेण्याचा विचार करु लागलेत. इलेक्ट्रीक कार घ्यायची म्हणजे ठराविक अंतरापलिकडे जाता येणार नाही, असं सर्वसाधारणपणे बोललं जातं. पण टाटा नेक्सन इव्हीबद्दल एक नवा दावा करण्यात आला आहे. एकदा चार्ज केली की टाटा नेक्सन ईव्ही ही कार तब्बल ३१२ किलोमीटर जाते, असं सांगितलं जातंय.

Tata Motors ची इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही एसयूव्ही ३१२ किमीपर्यंतची जबरदस्त ड्रायव्हिंग रेजे देते, असा दावा करण्यात आला आहे. शिवाय देशातील अन्य इलेक्ट्रिक कार्सची किंमतही निक्सॉनच्या तुलनेत बरीच जास्त असल्यामुळे या कारची मागणीही वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच Tata Motors ने या दमदार इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार काही अपडेटेड फीचर्स दिले आहे.

हेही वाचा : कामाची बातमी! NEFT या दिवशी करणं टाळा, कारण…

सर्वात मोठा बदल

टाटा कंपनीने Nexon EV मध्ये केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे ऍलॉय व्हील्ससाठी नवीन डिझाइन आणि दुसरा बदल म्हणजे अपडेटेड इन्फोटेन्मेंट सिस्टिम. आता इलेक्टिक निक्सॉनमध्ये बटण-लेस आणि डायल-लेस इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते. हा ७ इंचाचा डिस्प्ले असून टाटाच्या कनेक्ट नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टिमचा (OS) याला सपोर्ट आहे. शिवाय अॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोलाही ही सिस्टिम कनेक्ट करता येते.

हेही वाचा : 2000 रुपयांची नोट झाली गायब; सरकारकडून छापणं बंद

Tata Nexon EV मध्ये कंपनीनं Ziptron EV टेकनिकचा वापर केलाय. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही एसयूव्ही ३१२ किमीपर्यंतची जबरदस्त ड्रायव्हिंग रेजे देते, असा कंपनीचा दावा आहे. निक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये ३०.२ Kwh लिथियम-आयन बॅटरी असून त्यासोबत ८ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी मिळते. ही इलेक्ट्रिक कार ९.९ सेंकदात ताशी ०-१०० किमीचा वेग पकडते. डीसी फास्ट चार्जर द्वारे कार केवळ ६० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होते. तर घरातल्या सामान्य सॉकेटवर चार्ज करण्यासाठी या कारच्या बॅटरीला २० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी ८ तासांचा वेळ लागतो. Nexon EV ला 15A होम सॉकेट किंवा फास्ट चार्जरद्वारे घरीही चार्ज करता येते. सध्या भारतीय बाजारात या एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत १३.९९ लाख रुपयांपासून ते १६.५६ लाख रुपये आहे.

दरम्यान, अनेक जाणकारांनी कंपनीने केलेल्या ३१२ किलोमीटरच्या दाव्यात तथ्य नसल्याचं म्हटलंय. ही कार खरेदी केलेल्या एकानं जे दावे केलेत, ते ऐकून कदाचित तुम्हीही टाटा नेक्सन ईव्हीच्या प्रेमात पडू शकाल. पण नेमकी या गाडीची रेंज किती आहे?, हे जाणून घेण्यासाठी

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!