एकेकाळी मार्केट गाजवणाऱ्या TATA SUMOचं नाव कसं ठेवण्यात आलं, माहितीये?

एका माणसाच्या नावावरुन टाटा सुमोचं नाव ठेवण्यात आलं होतं

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : 1994 साली ऑटोमोबाईल इंडस्ट्री गाजवणारी गाडी म्हणून टाटा सुमोकडे पाहिलं जातं. टाटानं आपल्या या गाडीचं नाव सुमो का ठेवलं, यामागे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या कंपनीतल्याच एका कर्मचाऱ्याच्या नावावरुन टाटानं या गाडीचं नाव सुमो असं ठेवलं होतं. हा कर्मचारी कोण होता? आणि त्याचंच नाव या गाडीचं नाव ठेवताना का म्हणून वापरलं गेलं, हे तर त्याहूनही भारी आहे.

कुणाच्या नावावरुन ठेवलं सुमो नाव?

मधल्या काळात आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवताना दाम्पत्य जी ट्रीक वापरतात, तिच ट्रीक सुमोचं नाव ठेवतानाही वापरली गेली आहे. म्हणजे नवरा-बायको आपल्या आपल्या नावांचं पहिलं अक्षर घेऊन, त्यांची जुळवाजुळव करुन नवं नाव तयार करतात आणि ते आपल्या मुलाला किंवा मुलीला देतात. आता सुमोचं नाव ठेवतानाही हेच करण्यात आलं आहे.

हेही वाचा : झोपण्यापूर्वी गाणी ऐकत असला तर हे वाचाच!

टाटा सुमोचं नाव हे सुमंत मोळगावकर यांच्या नावावरुन ठेवण्यात आलंय. सुमंत मधला सु आणि मोळगावकर मधला मो घेऊन टाटानं आपल्या गाडीला सुमो हे नाव दिलंय.

’

सुमंत मोळगावकरांना एवढं महत्त्व का?

तर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सुमंत मोळगावकर यांच्या नावानं टाटानं आपल्या गाडीचं नाव सुमो का ठेवलं असेल? तर या प्रश्नाचं उत्तरही तितकंच इंटरेस्टिंग आहे. सुमंत मोळगावकर हे टाटा मोटर्सचे तेव्हा एमडी होती. त्याकाळी टाटा मोटर्स ही कंपनी टेलको म्हणून ओळखली जायची. तर आपल्या लंटटाईमच्या वेळी सुमंत मोळगावकर हे एका ढाब्यावर मुद्दाम जेवायला जायचे. आता ढाब्यावर जेवायला जाण्यामागेही एक खास कारण होतं. ढाब्यावर जेवायला जाऊन सुमंत मोळगावकर हे ट्रक ड्रायव्हर्सला भेटून त्यांच्याकडून ट्रकबद्दल गप्पा मारायचे आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी काढून घ्यायचे. ट्रकचा फिडबॅक कसाय, काय प्रॉब्लेम्स आहेत, ट्रकवाल्यांच्या काय गरजा असू शकतात, हे समजून घेण्यासाठी सुमंत मोळगावकर खास ढाब्यावर जेवायला जात असत.

हेही वाचा : या ५ गोष्टींसोबत गूळ खाणं असतं खूपच फायदेशील

कामाप्रती असलेलं सुमंत मोळगावकर यांचं डेडिकेशन प्रचंडं होतं. त्यांच्या कामाप्रती असलेल्या प्रेमाला पाहूनच टाटा कंपनीनं त्यांच्या या नव्या गाडीला सुमंत मोळगावकर यांच्या नावं द्यायचं ठरवलं. यातूनच तयार झालं टाटाच्या या गाडीचं नाव सुमो.

१९९४ साली आलेली सुमो ही गाडी प्रचंड गाजली. भरपूर जणांना घेऊन जाणारी, त्या काळी तिला देण्यात आलेला सॉलिड लूक यामुळे या गाडीनं मार्केटमध्ये अनेकांच्या मनावर जादू केली. या गाडीनं टाटाला प्रचंड यश आणि नफा मिळवून दिला होता. अजूनही अनेक कारप्रेमींसाठी टाटा सुमो हे पहिलं प्रेम असण्यासारखंच आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!