ग्रामीण भागात मारुती सुझुकीला वाढती मागणी

युनिट विक्रीचा आकडा 50 लाखांवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या ग्रामीण भागांत अर्थात गावागावांमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्यांची विक्री वाढली आहे. यावरून ग्रामीण भागांतील मारुती सुझुकीची लोकप्रियता लक्षात येत आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (एमएसआयएल) भारताच्या ग्रामीण बाजारांमध्ये गाड्यांच्या विक्रीचा एकूण आकडा 50 लाखांवर पोचला आहे. देशाच्या ग्रामीण भागात कंपनीची 1700 हून अधिक आउटलेट्स आहेत. गाड्यांच्या एकूण विक्रीपैकी जवळपास 40 टक्के विक्री ग्रामीण बाजारपेठेतून होते. कंपनीची एकूण विक्री चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जूनच्या तिमाहीत 3,53,614 युनिट इतकी नोंद झाली. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एकूण विक्री 14,57,861 युनिट इतकी झाली होती. हे प्रमाण 2019-20 मधील एकूण 15,63,297 युनिट विक्रीच्या तुलनेत कमी होते.

हेही वाचाः एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, सरकार ‘या’ सुविधा काढून घेण्याच्या तयारीत

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे केंद्रीय कार्यकारी संचालक (मार्केटिंग अँड सेल्स) शशांक श्रीवास्तव यांनी कंपनीच्या विक्रीतील उसळीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, आम्ही ग्रामीण भागातील ग्राहक आणि स्थानिक डीलर भागीदारांच्या सहकार्याने ग्रामीण भारतामध्ये एकूण विक्रीचा 50 लाखांचा आकडा पार केला आहे. ग्रामीण बाजारपेठांचा कंपनीच्या व्यवसायात एक विशिष्ट स्थान आहे. आम्ही ग्रामीण भारतातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. तसेच त्यांना उत्कृष्ट दर्जाच्या गाड्या आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

हेही वाचाः जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल-टाटा एकत्र

जूनमध्ये विक्रीत 217% मासिक वाढ

कोरोना महामारीच्या काळातही कंपनीने जून महिन्यात गाड्यांच्या विक्रीच्या बाबतीत घवघवीत यश मिळवलं. कंपनीने या महिन्यात मासिक आधारावर 217% टक्क्यांची वाढ नोंदवून एकूण 1,47,47,368 गाड्यांची विक्री केली. जूनमध्ये 17,237 यूनिटची विक्री करण्यात आली, तर मे महिन्यात 11,262 युनिटची विक्री झाली होती. तसंच मिनी आणि कॉम्पॅक्ट व्हेईकल सेगमेंटमध्ये चौपट प्रगती केली आणि 97,359 युनिटची विक्री नोंद झाली. युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये 25,484 युनिटची विक्री झाली. या सेगमेंटमध्ये मे महिन्यात 6,355 युनिटची विक्री झाली होती.

हेही वाचाः कदंब बसचे तिकिट आता ‘क्यूआर कोड’वरून

कारची वारंटी आणि नि: शुल्क सेवा 31 जुलैपर्यंत वाढवली

मारुतीने आपल्या ग्राहकांसाठी वारंटीची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. नि:शुल्क सेवा आणि वारंटीची मुदत वाढवण्याच्या या सुविधेचा त्या ग्राहकांना लाभ घेता येईल, ज्या ग्राहकांची अंतिम मुदत 15 मार्च ते 30 जून, 2021 यादरम्यान होती. मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (सर्व्हिस) पार्थो बनर्जी यांनी सांगितलं होतं की आम्ही आमच्या ग्राहकांना सुविधा उपलब्ध करीत वारंटीची मुदत वाढवत आहोत.

हा व्हिडिओ पहाः Video | CM ANGRY | खाणी सुरू करण्यासाठी मीच प्रयत्न केले : मुख्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!