रणबीरने अखेर कबूल केलंच तर! महामारी नसती तर आलियासोबत…

लग्नाबाबत रणबीरने उलगडले महत्त्वाचे राज

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : लग्न कधी करणार याबाबत अभिनेता रणबीर कपूरला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रणबीरने लग्नाबाबतचं गूपीत उलगडलंय. लवकरच आलिया भटसोबत लग्न करणार असल्याचे संकेत रणबीर कपूरने या मुलाखतीत दिले आहेत. जर कोरोना महामारी नसती तर याआधीच आलियासोबत लग्नाच्या बेडीत अकडलो असतो, असंही रणबीरने म्हटलंय.

राजीव मसंदने घेतलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने आपल्या लग्नाबद्दलच्या अफवांना पूर्णविराम लावलाय. कोरोना महामारी आली म्हणून लग्न लांबल्याचं त्यानं म्हटलंय.

मला लग्न करायचं, आणि लवकर मी माझ्या नावापुढे असलेला सिंगला शिक्का दूर करणार असल्याचं त्यानं मुलाखतीत नमूद केलं आहे.

आपल्या गर्लफ्रेन्डच्या तुलनेत आपणं फार काही साध्य केलं नसल्याचंही रणबीरनं आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे रणबीरने अख्खा लॉकडाऊन फक्त टीव्ही आणि सिनेमे पाहण्यातच घालवल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे आलीयाने मात्र गिटार पासून पटकथा लेखनाचे क्लास अटेंड केल्याचं त्यानं नमूद केलंय. हल्ली हल्ली वाचनाकडे वळल्याचंही रणबीरने म्हटलंय.

विशेष म्हणजे रणबीर आणि आलीया दोघंही लवकरच ब्रम्हास्त्र सिनेमा दिसून येणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन , मौनी रॉय आणि नागार्जुनही झळकणार आहेत. रणबीर कपूर या सिनेमात शिवाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आलिया ईशा नावाचं कॅरेक्टर करताना दिसणार आहे. चाहत्यांमध्ये या सिनेमाची उत्सुकता पाहायला मिळतेय.

पाहा रणबीरची संपूर्ण मुलाखत –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!