Ola भारतात लवकरच लाँच करणार Electric Scooters

कमी किंमतीत शानदार मायलेज

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो; कॅब सेवा पुरवणारी कंपनी ओला (Ola) भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारतेय.काही दिवसांपूर्वीच ओलानं भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा केलीये. पुढील वर्षी जानेवारीमध्ये ओला भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची शक्यताये. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलानं नेदरलँड्सची कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केलं असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करणार आहे.

जबरदस्त मायलेज :-
कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणारे. त्यात Etergo BV ने एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमीटरपर्यंतचं अतंर कापू शकणारी स्कूटर बनवलीये. त्यामुळे भारतातही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारी स्कूटर लाँच करण्याचा ओलाचा प्रयत्न असणारे. भारतात सध्या २० मिलियन म्हणजेच २ कोटी स्कूटर आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला भविष्यातील गाडी मानलं जातंय. भारतात पहिली स्कूटर लाँच केल्यानंतर एका वर्षात १० लाख इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्याचं कंपनीनं लक्ष्य ठेवलंय.

भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब :-
सध्या Etergo BV च्या प्रकल्पातच ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं प्रोडक्शन घेतलं जाईल. पण, कमी खर्च लागावा यासाठी पूर्णपणे भारतातच इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणारे. यासाठी ओला भारतातच मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी अनेक राज्य सरकारशी चर्चा करीतये.

हेही वाचा

WhatsApp वर आला Disappearing Messages पर्याय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!