येथून उजवीकडे वळा…! आता गुगल बोलणार मराठी भाषा!

गुगल मॅप्स आता मराठीतून सांगणार रस्ता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गुगल मॅप वापरणाऱ्या युझर्सची संख्या भारतात कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र, इंग्रजीचं ज्ञान नसणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सनं मोठी सोय केली आहे. कारण, युझर्सच्या आवश्यकतांनुसार गुगल मॅप्समध्ये बदल करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. गुगल मॅप्सची सेवा आता मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील एक घोषणा अलीकडेच करण्यात आली. गुगल मॅप्समध्ये १० भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युझर्सनाही एखादा पत्ता शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

हेही वाचाः फायनली FAU-G लॉंच, अक्षय कुमारने शेअर केला व्हिडीओ

ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम

गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू होत असल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युझर्सना एखादा पत्ता शोधणं सोपं होणार आहे. एका ब्लॉगपोस्टद्वारे गुगलने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की गुगल मॅप्सची सुविधा आता मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, मल्याळम, कन्नड, पंजाबी, उडिया, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

कोट्यावधी वापरकर्त्यांना होणार फायदा

या सेवेचा कोट्यावधी वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. इंग्रजी न बोलू शकणाऱ्या युझर्सना आता डॉक्टर, हॉस्पिटल्स, ग्रोसरी स्टोर्स, बस स्टॉप्स, रेल्वे स्टेशन्स आणि अन्य सर्व्हिसेस यांची माहिती मातृभाषेतून घेता येणार आहे, असं या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. भारतातील सर्वाधिक आवडत्या ठिकाणांची नावे आता या १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे इच्छित स्थळी जाणे किंवा आवडत्या ठिकाणांचा शोध घेणं आणखी सुलभ होणार आहे, असंही या ब्लॉगमधून सांगण्यात आलं आहे.

हेही बघाः Panchnama | तुमचा फोन हॅक होण्याआधी हा व्हिडीओ बघा!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!