नोकिया जी २० भारतात सादर

तीन दिवसांची बॅटरी लाईफ; तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः नोकिया फोन्सचे माहेरघर असलेल्या एचएमडी ग्लोबलतर्फे नोकिया जी २० भारतात सादर होत असल्याची घोषणा करण्यात आली. नवीन ‘जी’ श्रेणीचे नोकिया स्मार्टफोन्स आपल्या संयुक्तिक आणि वापरकर्त्यास सुलभ ठरेल अशा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुमच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्याचा उत्तम समतोल साधणारे आहेत. तीन दिवस टिकणाऱ्या, आजवरच्या सर्वात प्रदीर्घ बॅटरी लाईफने सज्ज असलेला नोकिया जी २० मध्ये भरवशाची अँड्रॉईड खात्री आहे. तुमची माहिती जितकी शक्य होईल तितकी सुरक्षित ठेवण्यासाठी तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि दोन वर्षांची ओएस अपग्रेडस मिळण्याची खात्री आहे. ४८एमपी क्वाड कॅमेरा ज्यामध्ये मोठा कोन आणि मोठी लेन्स, शक्तिशाली एआय इमेजिंग मोड्स, ओझेडओ ऑडीओ आणि भरपूर स्टोरेज असलेला नोकिया जी २० सर्जनशीलतेचा उत्तम नमुना आहे.

हेही वाचाः म्हापशाचे माजी नगरसेवक मार्टिन कारास्को यांचं निधन

एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष सन्मित सिंग कोचर म्हणाले, नोकिया जी २० हे २०२१ मधल्या आमच्या सर्वाधिक महत्त्वाच्या सादरीकरणांपैकी एक आहे. यामुळे आमच्या चाहत्यांना चांगली कामगिरी करणारे एक साधन मिळणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण भरवशाची अँड्रॉईड खात्री आणि जोडीला सर्वोत्तम गुणवत्ता या दोन्हीतून या दीर्घकालीन साधनाची निर्मिती झाली आहे. आधुनिक स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या गरजा ध्यानात घेऊन आम्ही याची रचना आणि बांधणी केली आहे. जसे की  सुंदर डिझाईन, अत्याधुनिक सुविधा आणि तडजोड होऊ शकणार नाही अशी सुरक्षितता. एचएमडी मध्ये नाविन्यपूर्णतेचा आग्रह धरताना पहिला दृष्टीकोन ग्राहकांना प्राधान्य देण्याचा असतो. आम्ही बनवत असलेल्या स्मार्टफोन्समधून हेच प्रतीत होते. आम्हाला हे माहिती आहे की तुम्हाला तुमचा स्मार्टफोन आवडत असतो, तुमची माहिती त्यात सुरक्षित राहील असा विश्वास तुम्हाला हवा असतो, दीर्घकाळ तुम्हाला तो वापरायची इच्छा असते. नोकिया जी२० मुळे तुम्हाला असा फोन मिळेल ज्याच्या तुम्ही प्रेमात असाल, भरवसा ठेऊ शकाल आणि जो दीर्घकाळ वापरू शकाल.

हेही वाचाः एक मोदी आणि अर्धे अमित शहा…केवळ दीड माणसं चालवताहेत केंद्र सरकार !

तीन गोष्टींची शक्ती

मिडिया टेक जी ३५ प्रोसेसरच्या शक्तीमुळे नोकिया जी२० मध्ये तीन दिवसांची बॅटरी लाईफची खात्री मिळते ज्यामुळे बॅटरी संपेल का याची काळजी करत न बसता तुम्ही अधिक काम करू शकता, अधिक लोकांशी जोडून अधिक गोष्टी निर्माण करू शकता. आधीपासूनच समाविष्ट केलेल्या अँड्रॉईड™ ११ मुळे सीमलेस पद्धतीतही विविध एप्समध्ये वापर आणि बदल करता येऊ शकेल. चेहरा आणि बाजूला बोटांचे ठसे याने अनलॉक करता येण्याची विकसीत सुरक्षा वैशिष्ट्येही यात आहेत. तीन वर्षांचे मासिक सिक्युरिटी अपडेट्स आणि दोन वर्षांची सॉफ्टवेअर अपग्रेडस मिळण्याची खात्री या एचएमडी ग्लोबलच्या ग्वाहीमुळे नोकिया जी२० हा तुमचा एक विश्वासार्ह सहकारी बनेल- ज्यावर तुम्ही प्रेम कराल, विश्वास ठेवाल आणि दीर्घकाळ वापराल.

हेही वाचाः कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना थेट प्रवेश? आज सुनावणी

तुमच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण टिपण्यासाठीचा सर्जनशील स्टुडीओ, तुमच्या जीवनशैलीसाठीचे सुंदर साधन

नवीन नोकिया जी २० मध्ये ४८ एमपी क्वाड कॅमेरा आणि ८ एमपी पुढचा कॅमेरा आहे. जोडीला प्रभावी ६.५” एचडी+ स्क्रीन, सुंदर डिस्प्ले आणि वापरण्यास सुलभ असा ब्राईटनेस बुस्ट आहे. ओझेडओ ऑडीओसह असलेला नोकिया जी २० हा ज्यांना सीमविरहीत तंत्रज्ञान अनुभव घ्यायची गरज आहे आणि ज्यांना आपली सर्जनशीलता आणि आकांश यांचा मुक्त वापर करायचा आहे त्या आधुनिक निर्मात्यांसाठी परिपूर्ण साधन आहे. सर्वोत्तम गुणवत्तापूर्ण बांधणी आणि साधे, शुद्ध आणि मोहक नॉर्डिक डिझाईन यामुळे नोकिया जी २० हा वजनाने हलका, स्लिम लाईन, टिकावू बनला असून नाईट आणि ग्लेशियर अशा दोन आगळ्यावेगळ्या रंगांत उपलब्ध आहे. नोकियाच्या सगळ्या हँडसेटची कडक चाचणी होत असते. त्यामुळे आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हाताळणी जरा उग्र असली तरी या फोन्सचा टिकाव लागू शकतो. नोकिया जी २० हा नुसताच धरायला सुलभ आहे असे नाही तर त्याचे ३ डी नॅनो पद्धतीचे मागचे कव्हर अशा प्रकारे बनविण्यात आले आहे की तो सहजासहजी तुमच्या हातातून निसटणार नाही.

हेही वाचाः श्रीपादभाऊंना बंदरे, पर्यटन तर नारायण राणेंकडं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग

प्रेम करा, भरवसा ठेवा, दीर्घकाळ वापरा

नोकिया जी २० हा रोजच्या दिवसाला ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेऊ शकाल, अवलंबून राहू शकाल आणि जो तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल अशा प्रकारे रचना आणि बांधणी केलेला तुमचा सहकारी आहे. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, टिकावू बांधणी आणि चालू असलेले सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स यातून तडजोड न होणारी कामगिरी आणि उपयुक्तता यांचा तुम्हाला लाभ होईल.

हेही वाचाः आजपासून जनसुनावणी! मग पणजीत गाडी कुठे पार्क कराल?

प्रकार, किंमत आणि उपलब्धता

नोकिया जी २० नाईट आणि ग्लेशिअर अशा दोन रंगांत, ४ जीबी/६४ जीबी RAM/ROM मध्ये उपलब्ध होईल. नोकिया जी २० Nokia.com/phones आणि एमेझॉन वर १५ जुलै पासून उपलब्ध होईल. नोकिया जी २० साठीची पूर्वनोंदणी एमेझॉन आणि Nokia.com वर ७ जुलै रोजी दुपारी १२ पासून सुरु होईल.

हेही वाचाः माझी पत्नी आगामी निवडणुक लढवण्यास इच्छुकः मायकल लोबो

नोकिया जी २० वरील सवलती

जे ग्राहक एमेझॉन किंवा Nokia.com/phones वर पूर्वनोंदणी करतील त्यांना या साधनाच्या किमतीवर ५०० रुपयांची सवलत मिळेल किंवा जर त्यांनी नोकिया जी २० आणि नोकिया पॉवर इअरबड्स लाईट अशी दोन्हीची खरेदी केली तर त्यावर त्यांना २०९९ रुपयांची विशेष सवलत मिळेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!