नवी SUV घेण्याच्या विचारात असलेल्या गोंयकरांसाठी खूशखबर

निसानने लॉन्च केली नवी मॅन्गाईट बी-एसयूव्ही

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : एसयूव्ही घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी आता आणखी एक तगडा ऑप्शन उपलब्ध आहे. निसानेही आपली एसयूव्ही आता बाजारात उतरवली आहे. अनेक दिवसांपासून निसानच्या या एसयूव्हीची चर्चा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून निसाननं आपली मॅग्नाइट ही गाडी (Nissan Magnite) लॉन्च केलीये. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या तत्त्वज्ञानानुसार निसान इंडियाने बनवलेल्या या गाडीची अनेक दिवसांपासूनच चर्चा सुरु होती.

निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ही गाडी प्रत्यक्ष रस्त्यांवर धावू लागणार. व्हर्च्युअली या गाडीचं लॉन्चिंग करण्यात आलं. आफ्रिका, मध्य पूर्व आणि भारतातील (एएमआय) निसानच्या लीडरशिप टीममधील प्रमुख प्रवक्त्यांनी या थेट प्रक्षेपण झालेल्या सोहळ्यात सहभाग घेतला होता. सादरीकरण केले, तर निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीविस्ताव यांनी या नव्या निसान मॅग्नाइटचे सारथ्य केले.

नवा ऑप्शन

निसानची ही गाडी थेट सोनेट आणि वेन्यू या गाड्यांशी स्पर्धा करणार आहे. कल्पक संशोधन, प्रगत तंत्रज्ञान आणि जपानी अभियांत्रिकी यांच्या एकत्रित आविष्कारातून ही कार साकारण्यात आली आहे. निसानच्या जागतिक एसयूव्ही डीएनएचे नवी निसान मॅग्नाइट हे प्रतीक आहे. वाहन ताकदवान कसं बनवलं पाहिजे, कशा प्रकारे ते चालवलं गेलं पाहिजे आणि समाजात ते कसं एकरूप झाले पाहिजे, या गोष्टी ध्यानाता ठेवून ही कार साकारण्यात आली आहे. निसान इंटलिजंट मोबिलिटीचा भाग म्हणून यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलाय. बाजारातील इतर गाड्यांसोबत निसानची ही गाडी कशी स्पर्धा करते, हे येणाऱ्या काळच सांगू शकेल. मात्र सध्यातरी लोकांना एसयूव्ही सेगमेन्टमध्ये आणखी एक ऑप्शन तयार झालाय, हेही नसे थोडके.

निसार मोटार इंडियाचे अध्यक्ष सिनान ओझकॉक म्हणतात…

आमच्या निसान नेक्स्ट धोरणात नवी निसान मॅग्नाइट कळीची भूमिका बजावेल. ग्राहककेंद्री कंपनी या नात्याने भारतीय बाजारपेठेबाबत निसानच्या असलेल्या वादातीत कटिबद्धतेचे हे प्रतीक आहे. ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी रोचक उत्पादने सादर करण्यासाठी आम्ही जे हरेक प्रयत्न करतो, त्याच्या केंद्रस्थानी ग्राहकच असले पाहिजेत, या आमच्या ब्रँडचे तत्त्वज्ञान अधोरेखित करणारे हे वाहन आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!