WhatsApp ला नवीन पर्याय?

सिग्नल (Signal) हा एक क्रॅास प्लॅटफार्म असून, तो जलद एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवा (Messeging Service) देतो.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरोः WhatsApp जगातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु, अनेक जण आता याला सोडून दुसऱ्या अ‍ॅपकडे जात आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच आणलेली प्रायव्हसी पॉलिसी होय. नव्या पॉलिसीमुळे कंपनी युजर डेटावर जास्त फोकस करणार आहे. तसंच जर युजर्संनी ही पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट केली नाही, तर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट होईल. त्यामुळे जगभरातील लोक Signal आणि Telegram सारख्या दुसऱ्या प्रायव्हेसी फोकस्ड इंस्टेंट मेसेजिंग अ‍ॅपकडे जात आहेत. सिग्नल एक असा अ‍ॅप आहे. जो युजरच्या डेटाच्या नावावर केवळ त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो. या अ‍ॅपला जगभरात जर्नालिस्ट, अ‍ॅक्टिविस्ट, राजकीय नेते, वकील, आणि सिक्योरिटी एक्सपर्ट्ससुद्धा मोठ्या संख्येने या अ‍ॅपकडे वळत आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा सिग्नल अ‍ॅपला दुजोरा

सिग्नल (Signal) हा एक क्रॅास प्लॅटफार्म असून, तो जलद एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवा (Messeging Service) देतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Alon Musk) यांनी या अ‍ॅपला दुजोरा दिल्याने, सिग्नल अ‍ॅपच्या युजरबेसमध्ये वाढ होताना दिसून येतायत. युजर्सचा सिग्नल अ‍ॅप (Signal app) डाऊनलोड करण्याकडे कल वाढत असल्याने या अ‍ॅपची सर्व्हर यंत्रणा हा वाढता ताण पेलू शकत नव्हती, त्यामुळे युजर्सला व्हेरिफिकेशन कोड येण्यास काहीसा उशीर होत होता. परंतु, आता या समस्येचं निराकरण करण्यात आलंय.

काय आहे Signal app?

सिग्नल हा इनक्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिससाठीचा एक पर्यायी प्लॅटफार्म असून, हे अ‍ॅप अँड्रॉईड, आयओएस आणि विंडोजवर उपलब्ध आहे. हा प्लॅटफार्म एक मोफत सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन (Software Application) आहे. या माध्यमातून युजर्स एंड टू एंड इनक्रिप्टशनद्वारे मेसेज आणि फोटो, व्हिडीओ शेअर करू शकतात. तसंच सिग्नल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑडिओ (Audio) आणि व्हिडीओ कॉल्स (Video Calls) देखील करता येऊ शकतात.

मीडिया शेअरिंग

व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच सिग्नल अ‍ॅपद्वारे युजर्स लिंक्स, फोटो, व्हिडीओ पाठवू शकतात. सिग्नल, व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्टचा (Contacts) वापर करतो. त्यानंतर इंटरनेटचा वापर करून युजर्स वैयक्तिक किंवा ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकता. सिग्नल तुमचे मेसेज किंवा कॉल्स अक्सेस करू शकत नाही.

सिग्नलचा वापर मोफत करु शकतो का?

सिग्नलचा वापर अगदी मोफत करता येतो. युजर्स आपल्या मोबाईलमध्ये सिग्नल हे डिफॉल्ट मेसेजिंग अ‍ॅप म्हणून वापरू शकतात. मात्र यासाठी मोबाईलच्या कॉलिंग आणि डेटा प्लॅननुसार मेसेजकरिता शुल्क आकारले जाऊ शकतं.

सिग्नलवर ग्रुप कॉलिंगचा पर्याय आहे का?

युजर्स सिग्नल अ‍ॅपद्वारे ग्रुप कॉलिंग (Group Calling) करू शकता. त्यासाठी 150 मेंबर्सची मर्यादा आहे.

सिग्नलचे प्रायव्हसी फीचर्स

सिग्नलमध्ये स्क्रिन लॉक, रिले कॉल्ससारखे अत्यंत कमी प्रायव्हसी फीचर्स आहेत. सिग्नल वापरणारे युजर्स, मेसेज पाठवताना वेबसाईटवरील लिंक प्रिव्हीव्यू ऑफ करू शकतात. ज्यांनी आपल्याला सिग्नलवर मेसेज पाठवला आहे, त्यांना आपण तो वाचला आहे हे कळू नये यासाठी युजर्स रिड रिसिपंट हा ऑप्शन बंद करू शकतात. जर तुम्ही सिग्नलवरील रिले कॉल्स हा ऑप्शन सुरू केला तर, तुमचा आयपी अ‍ॅड्रेस कोणलाही न समजता कॉल्स करता येऊ शकतात. परंतु यामुळे तुमच्या कॉल्सच्या क्वॉलिटीवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही मेसेज टाईप करत असल्याचं दुसऱ्या व्यक्तीला समजू नये असं वाटत असेल, तर ‘टर्न ऑफ इंडिकेटर’चा वापर करू शकता. तसंच सिग्नल अ‍ॅपवरील अकाउंट सुरक्षित राहावं यासाठी युजर्स सिक्युरिटी कोडदेखील सेट करू शकतात. परंतु, हा कोड जर युजर्स विसरले, तर त्याची रिकव्हरी होत नाही. तुमचा फोन आणि सिग्नल अ‍ॅप कोणीही वापरू नये यासाठी स्क्रिन लॉकचं फीचरही देण्यात आलंय.

सिग्नल तुमच्या अकाउंटची माहिती जमा करतं?

सिग्नल अ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार, हे अ‍ॅप तुमच्या अकाउंटची माहिती जमा करते. सिग्नल अकाउंट सुरू करण्यासाठी फोनमधील कॉन्टॅक्टचा वापर केला जातो. कॉल्स करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी ऑथेंटिकेशन टोकन, किज, पूश टोकन्स तसंच अन्य तांत्रिक माहिती युजर्सच्या मोबाईलमधून घेतली जाते. सेवा देण्यासाठीच ही अतिरिक्त तांत्रिक माहिती घेतली जात असल्याचं सिग्नलने म्हटलंय. तसंच युझर्सची कोणतीही वैयक्तिक माहिती, डेटा हा विकला किंवा भाडेतत्वावर दिला जात नाही किंवा त्यावर देखरेख ठेवली जात नसल्याचं सिग्नलने स्पष्ट केलं आहे. सिग्नलवरील चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्ह (Google Drive) किंवा आयक्लाऊडवर (iCloud) घेता येत नसल्याने सर्व चॅटस या युजर्सच्या मोबाईलमध्येच स्टोअर राहतात. जर युजर्सचा मोबाईल हरवला किंवा खराब झाला, तर हे चॅट्स पुन्हा मिळवता येत नाहीत.

तुम्हाला माहिती असेल की, अ‍ॅपच्या आतमध्ये काय आहे

या अ‍ॅपचे सोर्स कोड सार्वजनिक म्हणून उपलब्ध आहे. त्यामुळे जगभरात सिक्योरिटी एक्सपर्ट्स यात येत असलेल्या अडचणींना चेक करू शकतात. त्यामुळे याला बाकीच्या अ‍ॅप्सच्या तुलनेत वेगाने फिक्स केले जात आहे.

तुमच्या चॅट्सचा बॅकअप सुरक्षित करतो

हे अ‍ॅप तुमच्या मेसेजचे असुरक्षित बॅकअप्स क्लाउडला पाठवत नाही. ज्या ठिकाणी गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅप सह कोणीही वाचू शकतात. तर याला तुमच्या फोनमध्ये एनक्रिप्टेड डेटा बेस स्टोर केलं जातं. तसंच या अ‍ॅपमध्ये सर्वरमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट्स पर्यंत ठेवत नाही. तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स मॅच करण्यासाठी तुसऱ्या प्रायव्हसी फ्रेंडली मेथडचा वापर करतो.

डेक्सस्टॉप सपोर्ट/ऑडिओ मेसेजीस/कॉलिंग सपोर्ट

हे अ‍ॅप तुम्ही केवळ मोबाईलवर नाही, तर लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरही वापरू शकता. सोबतच तुम्ही टेक्स्ट मेसेजऐवजी ऑडिओही पाठवू शकता. तसंच ज्या प्रमाणे तुम्ही वॉट्सअ‍ॅपवर कॉलिंग करता. तसंच तुम्ही सिग्नलवरही करू शकता.

सिग्नल डाऊनलोड करणार्यांच्या संख्येत वाढ

अगदी कमी अवधीत सिग्नल अॅप प्रचंड लोकप्रिय होताना दिसतंय. हे अॅप डाऊनलोड करणार्यांची संख्या वेगाने वाढतेय. वॉट्सअॅप प्रेमी वॉट्सअॅपसोडून सिग्नलच्या दिशेने जाताना दिसतायत.

सिग्नल अॅप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!