मिंत्राचा लोगो ज्यांना आक्षेपार्ह वाटतोय, त्यांनी एकदा हे लोगोसुद्धा पाहायलाच हवेत…

मिंत्राच्या लोगोमुळे इतरही लोगो चर्चेत..

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून मिंत्रा कंपनीचा लोगो चर्चेत आला आहे. असं म्हटलं जातं की एम (M) वर्णमाला मिंत्राच्या लोगोमध्ये वापरली गेली आहे. तो एखाद्या महिलेच्या पायासारखा दिसतो. तर ती महिलांचा अनादर करणारी आहे. त्याच वेळी, एका मोठ्या थोर माणसानं हा लोगो मनात अश्लीलता निर्माण करत असल्याचाही आरोप केला आहे. या सगळ्यावरुन गरमागरमी झाली. आणि अखेरच मिंत्राचा लोगो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. .

या संपूर्ण घटनेनंतर लोक सोशल मीडियावर मिंत्राच्या लोगोनंतर इतरही अनेक लोगो शोधून काढत आहेत. वरवर पाहता अनेक वर्ष या लोगोंबाबत कोणतीही शंका घेतली गेली नव्हती. पण मिंत्राच्या निमित्तानं आता प्रत्येकजण प्रत्येक लोगोकडे एका वेगळ्या नजरेतून पाहू लागला आहे. त्याबाबत आपलं मत ठरवू लागलाय. नेटिझन्सनी असेच काही अतरंगी लोगो शोधून काढले आहेत आणि सोशल मीडियात त्याची चर्चाही रंगली आहे.

हर्ष एमव्ही नावाच्या वापरकर्त्याने बायजूच्या लोगोमध्ये एक त्रुटी दिसून आल्यानं काही प्रश्न उपस्थित केले आहे.

तर कुणाला मास्टरकार्डचा लोगो शंकास्पद वाटू लागलाय.

रोहित नावाच्या एका ट्विटर हॅन्डलनं एअर बीएनबीचा लोगो बदलण्याचीच मागणी करुन टाकलीये.

ऍमेझॉनचा लोगोही यातून सुटलेला नाही.

मोहित नावाच्या तरुणानं तर मिंत्राच्या लोगोमध्ये आक्षेपार्ह आढळल्याचं वाद समोर आल्यानंतर ध्यानात आल्याचं म्हणत खोचक शब्दांत टीका केली आहे.

मिंत्रावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता काहींना ल्युपिनचा लोगोही अश्लिल वाटू लागलाय.

तर काहींनी मिंत्राच्या लोगोवर आक्षेप घेणाऱ्या नाझ पटेलचंही कौतुक केलंय. तिचे आभार मानलेत. महिलांचा प्रश्न धाडसानं समोर मांडत तक्रार केल्याबद्दल तिचे आभारही मानले जात आहेत.

या सगळ्यात लोकांनी दूरदर्शनच्या लोगोलाही सोडलेलं नाही. दूरदर्शनचा लोगोही वादग्रस्त असल्याचा टोला लगावण्यात आलाय.

तर काहींना संत्र्यातही आक्षेपार्ह गोष्टी दिसू लागल्यात.

या सगळ्यात सुनिल नामक एका यूजरने जीमेलचा लोगोही बदलावा अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे.

कोण आहे नाज पटेल?

नाझ पटेल ही एक सामाजिक कार्यकर्ती आहे. तिचं पूर्ण नाव नाझ एकता कपूर आहे. मिंत्राचा लोगो बदलण्यासाठी तिने सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. नाझ पटेल या अवेस्ता फाउंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. या एनजीओमध्ये कुटुंबातून हद्दपार झालेल्या वृद्धांची काळजी घेतली जाते. ३१ वर्षीय नाझ पटेल ज्येष्ठ नागरिकांच्या खाण्यापिण्याची सोय पाहण्यासाठी एक फूड सर्विसही चालवतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.