पुण्यामध्ये सुरू झाली JIO 5G सेवा…

५ जी फोन्सवर वेगवान इंटरेनेटचा आनंद घेता येणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुणे : रिलायन्स जिओ कंपनीने पुण्यामध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे पुणेकरांना 1 Gbps+ पर्यंतच्या स्पीडमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळेल. जिओने शहराचा मोठा भाग त्यांच्या स्टँडअलोन ट्रू 5G नेटवर्कने कव्हर केल्यानंतरच शहरामध्ये त्यांच्या ट्रू 5G नेटवर्कची बीटा चाचणी सुरू केली जेणेकरून जिओ ग्राहकांना चांगले कव्हरेज मिळेल आणि सर्वात प्रगत जिओ ट्रू 5G नेटवर्कचा अनुभव घेता येईल.
हेही वाचाःGoa Crime : डिचोली येथे तीन कार्यालयांमध्ये चोरीचा प्रयत्न…

यावर जिओचे प्रवक्ते म्हणाले, “12 शहरांमध्ये जिओ ट्रू 5G लाँच केल्यानंतर, मोठ्या संख्येने जिओ वापरकर्त्यांनी जिओ वेलकम ऑफरमध्ये नावनोंदणी केली आहे. ज्यामुळे जिओला ग्राहक आणि सेवा फीडबॅकसह जगात कुठेही सर्वात प्रगत 5G नेटवर्क तयार करण्यात मदत होईल.
अपेक्षेप्रमाणे, जिओ च्या ट्रू 5G नेटवर्कवरील डेटा वापर जिओ च्या 4G नेटवर्कवर वापरल्या जाणार्या सध्याच्या डेटापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. विशेष म्हणजे हा डेटा अनुभव 500 Mbps ते 1 Gbps च्या दरम्यान कुठेही ब्रेक-नेक स्पीडमध्ये आणि अत्यंत कमी लेटन्सीवर वितरित केला जात आहे. ज्यामुळे विविध क्षेत्रातील यूज्ड केसेस सक्षम होतात ज्या केवळ ट्रू 5G नेटवर्क मुळेच प्रत्यक्षात येऊ शकतात असे ते म्हणाले.
हेही वाचाःGoa Accident : चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने कुंडई येथे अपघात…

जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित करणार

ते पुढे म्हणाले, पुण्यामध्ये विद्यार्थीसंख्या मोठी आहे आणि ते एक आघाडीचे आयटी हब आहे. तसेच भारतातील सर्वात महत्त्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. जिओ ट्रू 5G पुणेकरांसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरेल. 23 नोव्हेंबरपासून, पुण्यातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1 Gbps स्पीडपर्यंत अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!