Google गंडलं! करोडो युजर्सला सर्व्हर डाऊनचा फटका

गुगलची सर्व्हिस डाऊन झाल्यानं ट्विटरवर नेटकऱ्यांचा संताप

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी गुगलचं सर्व्हर डाऊन झाल्यानं युजर्सना मोठा फटका बसलाय. कारण जीमेलसह, यू ट्यूब, गुगल ड्राईव्ह ठप्प झाल्यानं युजर्सचा खोळंबा झालाय. त्यामुळे गुगल गंडल्यानं संतापलेल्या नेटकऱ्यांनी ट्विटरवर गुगलवर निशाणा साधलाय. संपूर्ण भारतात झालेल्या सर्व्हर डाऊनचा फटका करोडो युजर्सला बसलाय. अनेकांची कामं गुगल डाऊन झाल्यामुळे खोळंबली आहेत. तर कित्येकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलंय.

गुगलची सर्व्हिस डाऊन नेमकी का झाली, हे कळू न शकल्यानं सुरुवातीला अनेकजण गोंधळून गेले होते. मात्र सर्व्हर डाऊनमुळे गुगलची सर्व्हिस डाऊन झाल्याचं कळल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केलाय. तांत्रिक कारणामुळे गुगलची सर्व्हिस डाऊन झाल्याचं कळतंय. सध्या गुगलकडून तांत्रिक बिघाडावर तातडीनं काम केलं जात असून आता तही सर्व्हिस तातडीनं सुरु करण्याचे प्रयत्न गुगलच्या टीमकडून केले जात आहेत.

गुगल इंडियाकडून तातडीनं नेमका बिघाड शोधून काढून ही सर्व्हिस शक्य तितक्या लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र तोपर्यंत तरी अनेकांना या सर्व्हर डाऊनचा फटका बसणार हे नक्की. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक ठिकाणी गुगल सर्च इमेज, यू-ट्यूब व्हिडीओ, मेल लॉग ईन या सगळ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय.

तासभर झालेल्या या खोळंब्यानंतर यु-ट्यूब आणि गुगलची सर्व्हिस पुन्हा एकदा सुरु झाली असल्याचा दावा केला जातोय. मात्र तोपर्यंत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर गंडलेल्या गुगल सर्व्हरवर सडकून टीका केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!