‘द ग्रेट गामां’चा गुगलकडून सन्मान!

कुस्ती जगतात गामा कुस्तीपटूचा मान खूप मोठा होता

रजत सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : गामा पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने खास डूडल बनवून त्यांचा गौरव केला आहे. गामा पैलवान यांचा आज १४४वा वाढदिवस आहे. गुगलने त्यांना डूडलद्वारे शुभेच्छा दिल्या. या डूडलमध्ये त्यांच्या उजव्या हातात चांदीची गदा दिसत आहे. ही चांदीची गदा त्यांना प्रिन्स ऑफ वेल्स यांनी दिली होती. कुस्ती जगतात गामा कुस्तीपटूचा मान खूप मोठा होता. अमृतसरच्या जब्बोवाल गावात २२ मे १८७८ रोजी गामा पैलवान यांचा जन्म झाला.
हेही वाचा:’हे’ आहेत पेट्रोल-डिझेल चे ‘नवे’ दर…

वयाच्या दहाव्या वर्षी व्यावसायिक कुस्ती खेळायला सुरुवात

त्यांचे वडील मुहम्मद अझीझ बक्श दतियाचे तत्कालीन महाराजा भवानी सिंग यांच्या दरबारात कुस्ती लढत असत. गामा पैलवान ६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी व्यावसायिक कुस्ती खेळायला सुरुवात केली होती. त्यांच्या ५२ वर्षांच्या कुस्तीच्या करियरमध्ये त्यांना एकही कुस्तीगीर पराभूत करू शकला नाही.
हेही वाचाःम्हापसात कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

गामा पहेलवान यांचा आहार 

गामा पैलवान दिवसातून १० तासांहून अधिक सराव करायचे आणि सरावासाठी एका दिवसात ४० पैलवानांशी कुस्ती खेळायचे. ते दररोज ५ हजार बैठक आणि ३ हजार दंड मारायचे. ते रोज ६ गावठी कोंबड्या, १० लिटर दूध, अर्धा लिटर तूप, दीड लिटर बटर, बदामाचे सरबत आणि १०० भाकऱ्या खात असत.
हेही वाचाःयेत्या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी, वाचा सविस्तर…

८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कुस्तीबाबतलं त्यांच्यातलं कर्तुत्व पाहून दतिया संस्थानाचे राजे महाराजा भवानी सिंह यांनी त्यांना कुस्तीसाठीच्या सर्व सुविधा स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानात जाऊन काही नवख्या कुस्तीगीरांनाही प्रशिक्षण दिलं होतं. १९६० मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी गामा पहेलवान यांनी पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. 
हेही वाचाःएवढ्या रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!