फायनली FAU-G लॉंच, अक्षय कुमारने शेअर केला व्हिडीओ

पबजीला टक्कर देऊ शकेल FAU-G?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एक्शन स्टार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पबजीला टक्कर देणारा गेम अखेर लॉन्च केलाय. फौजी असं या गेमचं नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या गेमची प्रतीक्षा होती. अखेर हा गेम प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लॉन्च करण्यात आला आहे. अक्षयने PUBG या गेम सारखा FAU-G Fearless and United Guards हा भारतीय गेम लॉंच केला असून आता गेमिंगमध्ये नेमकी याची काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचंय. हा मेड इन इंडिया मल्टी- प्लेयर मोबाइल गेम आहे. त्याचा व्हिडीओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अक्षयने इन्स्टाग्रामवर या गेमचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष दाखवण्यात आलाय. पबजी बॅन झाल्यानंतर गेमिंग करणाऱ्यांना मोठा झटका बसला होता. त्यांच्यामध्ये फौजी गेमबद्दल उत्सुकता पाहायला मिळाली होती. अखेर हा गेम लॉन्च झाल्यानंतर आता गेमिंगशी संबंधित असणारे याला नेमका कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, अक्षय कुमारनं शेअर केलेला व्हिडीओ पाहिला नसेल.. तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा.

तूर्तास हा गेम प्ले स्टोअर आला आहे. मात्र ऍपस्टोअरवर अजूनही हा गेम आल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे आयफोन युजर्सना हा गेम पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी या गेमचे ग्राफिक्स चांगले असल्याचं बोललं जातंय. मात्र काही दिवसांतच या गेमचा नेमका रिव्हू काय आहे, याबाबतची अधिक माहिती समोर येईल.

हेही वाचा – Panchnama | तुमचा फोन हॅक होण्याआधी हा व्हिडीओ बघा!

हेही वाचा – वय, धर्म, ख्याती हे सगळं दुय्यम लग्नासाठी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!