7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात

जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: जीप कंपास बेस्ड 7-सीटर SUV यावर्षी 26 ऑगस्टपर्यंत अनुक्रमे भारतीय आणि ब्राझीलच्या बाजारात मेरिडियन आणि कमांडर नेमप्लेट्ससह जागतिक पदार्पण करण्याची शक्यता आहे. जीप 7-सीटर SUV विकसित करत आहे. ही अमेरिकन कार निर्मात्याची थ्री-रो एसयूव्ही जीप कंपासवर आधारित असेल. याआधी चाचणी दरम्यान ही कार बऱ्याचदा पाहायला मिळाली आहे. या कारमध्ये एक हेवी कॅमो देखील आहे. आगामी मॉडेलला भारतीय बाजारात जीप मेरिडियन म्हटले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः धिरयो: चौघांवर गुन्हा नोंद

मॉडेलचं जागतिक पदार्पण 26 ऑगस्ट रोजी होईल

ब्राझीलमध्ये या कारला जीप कमांडर असं नाव दिलं जाईल, असं अपेक्षित आहे. या मॉडेलचं जागतिक पदार्पण या वर्षी 26 ऑगस्ट रोजी होईल, असं सांगण्यात आलं आहे. कम्पासवर आधारित, मेरिडियन/कमांडर वाढीव डायमेंशन्सचा दावा करते. तसंच, कंपासच्या तुलनेत इंटिरिअर्स अधिक रिफाइन केले जातील कारण 7 सीटर एसयूव्ही ब्रँडच्या लाइन-अपमध्ये कंपास आणि मोठ्या ग्रँड चेरोकी दरम्यान फिट होईल. ब्रँडचा एक टीझर आधीच शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 7-सीटर एसयूव्ही-कमांडरच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे.

हेही वाचाः कौतुकास्पद! सर्पमित्र प्रचिताच्या धाडसाची गोष्ट

लीक झालेल्या इमेजेस मेरिडियनचं डिझाइन रिव्हील करतात. ही कार ग्रँड चेरोकीच्या स्केल-डाउन आवृत्तीसारखी असेल. ट्रेडिशनल 7-स्लेट ग्रिल समोरच्या बाजूस अधिक आकर्षक दिसेल. एक हाय-सेट बोनेट, रेक्टँग्युलर हेडलॅम्प आणि इतर एसयूव्ही हायलाइट कमांडरला अधिक दमदार बनवतात.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला युवकांचा मोठा प्रतिसाद

7-सीटर Jeep SUV मध्ये काय असेल खास?

मागील भाग क्रोम रिबनसह लाइट बारसह येऊ शकतो. यात इंटिग्रेटेड रूफ स्पॉयलरही मिळेल. अशी अपेक्षा आहे की 7-सीटर एसयूव्हीमध्ये बरीच वैशिष्ट्ये असतील. 10.1 इंचाची टचस्क्रीन सेंटर कन्सोलवर ठेवली जाईल, जी अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कॉम्पॅटिबिलिटी ऑफर करते.

जीप दोन सीटिंग कॉन्फिगरेशन प्रदान करेल, ज्यात 6-सीटर आणि 7-सीटर लेआउटचा समावेश आहे. ब्राझीलच्या बाजारात, कमांडर 2.0-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह आणि 1.3-लीटर टर्बोफ्लेक्स पेट्रोल मोटरसह विक्रीसाठी सादर केली जाईल. इंडिया स्पेक मॉडेल मेरिडियनवर तत्सम पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचाः गोव्यातील योगिनींचे दैदिप्यमान यश

भारतात कधी लाँच होणार

लाँच टाइमलाइनबद्दल बोलायचं झाल्यास, जीप मेरिडियन 2022 च्या पहिल्या सहामाहीत भारतीय बाजारात सादर केली जाईल. त्याची प्रारंभिक किंमत अंदाजे 28 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकतं. मेरिडियन भारतीय बाजारात VW Tiguan Allspace आणि Skoda Kodiaq यांच्याशी स्पर्धा करेल. जीप 7 सीटर एसयूव्ही तयार करत आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MISSION 22 PLUS | भाजपचं २०२२साठी संघटनात्मक काम सुरू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!