जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल-टाटा एकत्र

भारती एअरटेलने 5 जी तंत्रज्ञानासाठी इंटेलचे तंत्र व्यासपीठ वापरण्याची योजना बुधवारी जाहीर केली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: देशात येऊ घातलेल्या 5 जी नेटवर्कसाठी बड्या कंपन्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ सर्वात आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून मुंबई आणि पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये 5 जी नेटवर्कच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता भारती एअरटेल आणि टाटा समूहाने ‘इंटेल’बरोबर व्यावसायिक सहकार्य करत 5जी मोबाईल तंत्रज्ञानासाठी योजना आखली आहे.

हेही वाचाः कदंब बसचे तिकिट आता ‘क्यूआर कोड’वरून

भारती एअरटेलने 5 जी तंत्रज्ञानासाठी इंटेलचे तंत्र व्यासपीठ वापरण्याची योजना बुधवारी जाहीर केली. खुल्या ध्वनिलहरीचे जाळे (ओ-रॅन) त्यासाठी उपयोगात आणलं जाणार आहे. भारती एअरटेलने यासाठी इंटेलबरोबर कामही सुरू केलं असून काही शहरांमध्ये त्याची चाचणी घेण्यात येत आहे.

हेही वाचाः उपमुख्यमंत्र्यांकडून पेडणेकरांची नोकऱ्यांच्या नावाखाली फसवणूक

इंटेलच्या ‘ओ-रॅन’ मंचावर टाटा समूहही दाखल होऊ पाहात आहे. जपानच्या डोकोमोच्या साहाय्याने यापूर्वी दूरसंचार क्षेत्रात असलेल्या टाटाने ‘5 जी’साठी इंटेल तसंच एअरटेलबरोबर जाण्याचं निश्चित केलं आहे. तंत्रज्ञानासाठी टाटा समूहातील टीसीएस ही कंपनी पुढाकार घेत आहे.

हेही वाचाः वायफायची केबल कापल्यावरुन आमदार सोपटे, आरोलकरांमध्ये शीतयुद्ध

देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स

काही दिवसांपूर्वीच दूरसंचार विभागाने व्ही (VI), एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओसह (Reliance Jio) दूरसंचार ऑपरेटर्सना ग्रामीण भागात 5 जी (5G) तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास सांगितलं होतं. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना शहरी भागात 5 जी अ‍ॅप्लिकेशन्सच्या चाचणीसह ग्रामीण भागातही या चाचण्या करण्यास सांगितलं आहे. एमटीएनएलने दिल्लीत 5 जी च्या चाचण्यांसाठी सी-डॉटसोबत काम सुरु केलं आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं की, ते नजफगडजवळ 5 जी टेस्ट करणार आहेत. कंपनीने शुल्क जमा केल्यानंतर त्यांना ट्रायल स्पेक्ट्रम दिलं जाईल.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवरच

दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी 5G च्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, टेलिकॉम ऑपरेटरला 700 मेगाहर्ट्झ बँड, 3.3-3-6 गीगाहर्ट्झ (GHz) बँड आणि 24.25-28.5 GHz बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आलं आहे.

हेही वाचाः गोव्यातही पेट्रोलनं ओलांडली शंभरी ; दोडामार्गवासीयांची पुन्हा घालमेल !

10 पट डाउनलोड स्पीड मिळणार

दूरसंचार मंत्रालयाच्या मते, ग्राहकांना 4G च्या तुलनेत 5G तंत्रज्ञानाद्वारे दहापट चांगलं डाउनलोड स्पीड आणि तीनपट स्पेक्ट्रम कार्यक्षमता मिळेल. परीक्षणादरम्यान, भारतीय सेटिंगमध्ये 5 जी ची चाचणी केली जाईल. यामध्ये टेली-मेडिसिन, टेली-एज्युकेशन आणि ड्रोन-आधारित कृषी देखरेख आदींचा समावेश असेल. याद्वारे टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या नेटवर्कवर विविध 5G उपकरणांची सहज चाचणी घेण्यास सक्षम असतील.

हेही वाचाः श्रीलंकेतला दुर्मिळ ‘तस्कर’ सावंतवाडीत !

शहरांसह ग्रामीण भारतातही 5G च्या चाचण्या

सध्या चाचणीचा कालावधी 6 महिने असेल. त्यापैकी उपकरणे खरेदी आणि स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ऑपरेटरला शहरी सेटिंगव्यतिरिक्त ग्रामीण आणि अर्ध-शहरी सेटिंग्जमध्येही चाचणी घ्यावी लागेल, जेणेकरून 5 जी तंत्रज्ञानाचा फायदा देशभरातील नागरिकांना मिळेल. ही सेवा केवळ शहरी भागात मर्यादित नसावी. तथापि, आणखी एक उद्योग स्त्रोत असा दावा करतो की, कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरला पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये स्पेक्ट्रम वाटप करण्यात आलेलं नाही.

हा व्हिडिओ पहाः Video | मांद्रेतील विद्यार्थ्यांना Free WiFi Hotspot

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!