‘ पिले पिले ओ मोरे जानी ..’ | काय सांगता ? बियर मिळणार पाउडर स्वरूपात ? होय, आता झटपट घरबसल्या ‘अशी’ तयार करा थंडगार बिअर
जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे असा कंपनीचा दावा आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

उन्हाळा सुरू होताच बाजारात थंड पेयांची मागणी वाढते. त्यासोबत मागणी वाढते ती म्हणजे बिअरची . उन्हाची लाहीलाही होत असताना अनेक शौकीनांना थंडगार बिअर पिण्याची इच्छा असते. दारु पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण मद्यप्रेमी यापासून काही दूर राहू शकत नाहीत. बिअरमध्ये अल्कोहोल असते, त्यामुळे बिअर तुम्हाला सर्व ठिकाणी उपलब्ध नसते किंवा काही ठिकाणी पिता येत नाही. बहुतेक वेळा दुकानातून घरी आणताना बिअर गरम होते. त्यामुळी पुन्हा थंड होईपर्यंत वाट पाहावी लागते. पण आता तुमच्या सर्व समस्यांवर उपाय सापडला आहे. जर्मनीतील एका कंपनीने आता बिअर पावडर तयार केली आहे.
फक्त दोन मिनिटांत घरीच तयार करा थंडगार बिअर
या बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही सहज घरच्या घरी अवघ्या दोन मिनिटांमध्ये थंडगार बिअर तयार करु शकता. हे ऐकून खोटं वाटत असले तरी हे खरं आहे. जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. तर अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे. याआधी कधीही पावडर स्वरूपात बिअर बनवली गेली नव्हती असा दावा या कंपनीने केला आहे.

अशी बनवा झटपट बिअर
तुम्ही फक्त दोन चमचे पावडर थंड पाण्यात मिसळा आणि तुमची थंडगार बिअर तयार आहे. यासोबतच हे पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही.
जगातील पहिल्या बिअर पावडरचा शोध ?
जर्मन न्यूज वेबसाईट DW मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पूर्व जर्मनीमध्ये ही बिअर पावडर बनवण्यात आली असून ही बिअर पावडर हा अशा प्रकारचा पहिला शोध आहे. पण असे नक्कीच नाही या आधीही पावडर स्वरूपात बिअर बनविण्याचे प्रयत्न झालेत . जगातल्या अनेक ब्रेवरीजनी या गोष्टी करून पाहिल्या आहेत, बऱ्याचदा हा प्रयत्न फॉल ठरला ही गोष्ट वेगळी.तर आता पूर्व जर्मनीमधील नोएटसेल ब्रुअरी कंपनीने ही बिअर पावडर तयार केली आहे. ही बिअर पावडर बनवणाऱ्या नोएटसेल ब्रुअरीने सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस ही बिअर पावडर बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

”रहें मुबारक पीनेवाले, खुली रहे यह मधुशाला..”
बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही दोन मिनिटांत तुमची बिअर तयार होईल. बिअर बनवणाऱ्या कंपनीनं सांगितलं की, तुम्ही ही बिअर पावडर खरेदी करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा यापासून बिअर बनवून त्याचा आनंद घेऊ शकता. दोन चमचे बिअर पावडर बाटलीत किंवा ग्लासमध्ये टाका आणि मिक्स करा आणि तुमची बिअर तयार आहे. मात्र, सध्या ही बिअर पावडर फक्त जर्मनीमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ही बिअर पावडर संपूर्ण जगात उपलब्ध होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. तुम्ही भारतात राहात असाल तर तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावं लागेल, कारण भारतीय बाजारात बिअर पावडरला प्रवेश मिळण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतील.