Wedding Destination | लग्जरी लग्न करायचंय?

ही आहेत देशातील १० बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राजेशाही थाटात लग्न करण्याची इच्छा कुणाला नसते… म्हणूनच की काय, आज देशभरात वेडिंग डेस्टिनेशनची चलती आहे. लग्नसोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी आज लोग लाखो रुपये खर्च करतात. तरी बऱ्याचदा चुकीचं डेस्टिनेशन निवडल्यामुळे पूर्ण प्लॅनिंगच खराब होतं. चला तर, आज आपण देशातील १० वेडिंग डेस्टिनेशन्सबद्दल जाणून घेऊयात.

‘गोवा’

पार्टीप्रेमींसाठी गोव्यापेक्षा दुसरं उत्तम ठिकाण दुसरं कोणतं नाही. बहुतेक जोडपी लग्नानंतर हनीमूनसाठी गोव्यात येतात. बीच वेडिंगसाठी गोवा खूपच प्रसिद्ध आहे. लग्जरी वेडिंग डेस्टिनेशनमध्ये गोवा एक आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा काळ इथे येण्यासाठी बेस्ट आहे. या काळात इथे बऱ्याच उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं, ज्यामुळे तुमच्या लग्नाची मजा दुप्पट होईल.

‘केरळ’

नयनरम्य निसर्ग आणि समुद्र किनाऱ्यांसाठी केरळ प्रसिद्ध आहे. तरी डेस्टिनेशन वेडिंगसाठी केरळ एवढं प्रसिद्ध नाही आहे पण गर्दीपासून दूर आणि शांत ठिकाणं ज्यांना पसंत आहेत, ते या बाजूला येऊ शकतात. केरळचं बीच वेडिंग लोकांना आपल्याकडे आकर्षित करतंय. कोवलममधील द लीला हा देशातील सर्वात चांगल्या वेडिंग रिसॉर्ट्समधील एक आहे. सप्टेंबर पासून मार्चपर्यंत इथे लग्न करण्यासाठी सर्वात बेस्ट काळ आहे कारण मान्सूनमध्ये केरळमध्ये एक वेगळीच मजा असते.

‘गुजरात’

समृद्ध संस्कृती आणि वारसा यामुळे गुजरातला राजकुमारांची भूमी असं म्हटलं जातं. जर तुम्हाला राजेशाही थाटात लग्न करायचं असेल, तर गुजरातपेक्षा दुसरं चांगलं ठिकाण नाही मिळणार. इथे असे काही राजेशाही किल्ले आणि भव्य विवाह स्थळं आहेत, जी राजेशाही पद्धतीने लग्न करण्यासाठी पूर्ण व्यवस्था करून देतात. ऋतुमानानुसार नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ इथे लग्न करण्यासाठी सर्वात सुंदर आहे.

‘जयपूर’

जर तुम्हाला महालात राजेशाही लग्न करण्याची इच्छा आहे तर जयपूरमध्ये तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचं प्लॅनिंग करू शकता. इथे लग्न सोहळा महालात साजरा करणं हा नेत्रदीपक अनुभव असतो. इथला जय महाल पॅलेस रिसॉर्टला पर्यटकांकडून जास्त पसंती मिळते. या पॅलेसमध्ये लग्न करणं खरोखरंच स्वप्न सत्यात उतरण्यासारखं असतं. हिवाळा ऋतू इथे लग्न करण्यासाठी बेस्ट आहे.

‘मसूरी’

जर तुम्ही डोंगरावर लग्न करण्याचं स्वप्न पाहताय तर मसूरी तुमच्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे. जेडब्ल्यू मॅरिएट वॉलनट ग्रोव रिसॉर्ट अॅंड स्पामध्ये तुम्हाला त्या सर्व सोयी-सुविधा मिळतील, ज्या तुमचं ड्रीम वेडिंग पूर्ण करतील. इथे ३०० पेक्षा जास्त पाहुण्यांसाठी जागा आहे.

‘ऋषिकेश’

पवित्र नगरी ऋषिकेशमध्ये लग्न बंधनात अडकणं हे वेगळाच अनुभव असतो. डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप दूरवरून जोडपी इथे लग्न करण्यासाठी येतात. इथलं शांत वातावरण, सुंदर मंदिरे आणि निसर्ग लोकांना खूप आवडतो. इथे गंगा नदीच्या किनारी लग्न समारंभासाठी बेस्ट ठिकाण आहे. राजाजी नॅशनल पार्क ऋषिकेशमधील सर्वात लोकप्रिय वेडिंग वेन्यूमधील एक आहे. ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा काळ इथे लग्नासाठी सर्वात सुंदर काळ मानला जातो.

‘शिमला’

हिरवागार निसर्ग आणि डोंगररांगांच्या मधोमध नव्या आयुष्याची सुरुवात करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्हीही असंच स्वप्न पाहिलंय तर तुमचं डेस्टिनेशन वेडिंग तुम्ही शिमलामध्ये प्लॅन करू शकता. इथे असे अनेक रिसॉर्ट आहेत जे आपल्या बाजूने लग्नाची सगळी व्यवस्था करतात जेणेकरून तुम्हाला कोणत्याच प्रकारचं टेन्शन राहात नाही आणि तुम्ही आरामात लग्नाचा आनंद घेऊ शकता. शिमल्यात लग्न करण्यासाठी उन्हाळा सर्वात चांगला ऋतू आहे.

‘उदयपूर’

रॉयल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये उदयपूर बरंच लोकप्रिय आहे. समृद्ध वारसा, संस्कृती आणि वास्तुकलेची भव्यता लोकांना इथे येण्यासाठी आकर्षित करते. सरोवरांनी वेढलेलं उदयपूर देशातील सर्वांत रोमॅंटिक शहरांपैकी एक आहे आणि इथे लग्न करणं नेहमीच संस्मरणीय असेल. एप्रिल ते ऑगस्ट महिना इथे लग्न करण्यासाठी बेस्ट आहे.

‘मथुरा’

प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांमधील मथुरा एक आहे. इथे अनेक सुंदर रिसॉर्ट आहेत जे डेस्टिनेशन वेडिंगसाठी बेस्ट आहे. श्रीकृष्णच्या नगरीत विवाह बंधनात अडकणं आणि त्याच्या आशीर्वाद घेणं तुमच्यासाठी अद्भुत असतं. इथली संस्कृती, परंपरा आणि स्वादिष्ट जेवणामुळे तुम्ही मथुरेच्या प्रेमातच पडता. इथे अनेक सुंदर मंदिरं आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ इथे लग्नासाठी चांगला काळ मानला जातो.

‘अंदमान निकोबार’

जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांत वातावरणात बीच वेडिंग करायचं असेल, तर अंदमान निकोबार तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. स्वच्छ समुद्रकिनारे आणि सुंदर देखाव्यांमुळे अंडमान निकोबार डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोकप्रिय होतंय. अंदमानचे भव्य रिसॉर्ट्स आणि इथला पाहुणचार तुमच्या काळजाला हात घालते. सप्टेंबर ते मे हा काळ इथे लग्नासाठी बेस्ट काळ ठरतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!