KITCHEN TIPS | तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे? मग या खास टिप्स तुमच्यासाठी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोशिंबीर करताना ती आंबट होणं किंवा बटाट्याचे पराठे लाटताना त्यातून सारण बाहेर येणं, असं होतं का? जर तुम्हाला स्वयंपाक करताना या समस्या जाणवत असतील तर काळजी करू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कुकींग किचन टीप्स आणि ट्रीक्स. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार. मग तुम्हीही करून पाहा या ट्रीक्स आणि दुसऱ्यांसोबतही शेअर करा या कुकींग आयडियाज…चला तर मग पाहुयात किचन टिप्स.

टीप नंबर 1

पहिली टीप आहे लसणाचा योग्य उपयोग

जर जेवणांमध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही. अशावेळी लसूण कापून घालण्याऐवजी कूटून किंवा किसून घालावा. असं केल्यास लसणाचा वास चांगला लागतो.

टीप नंबर 2

दुसरी टीप आहे, चहा बनवल्यावर उरलेल्या चहाच्या चोथ्याबाबत

अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात. पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता. चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या, लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता.

टीप नंबर 3

तिसरी टीप आहे मोकळा भात शिजवण्यासाठी

खूप महिलांची अशी तक्रार असते की, भात मोकळा होत नाही. शिजल्यावर भात एकदम गच्च होतो. जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा. जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं. यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही.

टीप नंबर 4

चौथी टीप आहे सुकामेवा चांगल्यारीतीने कसा ठेवाल हे सांगणारी

तुम्ही पाहिलं असेल की, बरेचदा सुकामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते. असं होऊ नये याकरिता सुकामेवा नेहमी एअर टाईट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा.

टीप नंबर 5

पाचवी टीप आहे कोशिंबीर आंबट होऊ नये म्हणून काय करावं हे सांगणारी

जेव्हा पाहूणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते. लक्षात घ्या, हे टाळण्यासाठी दह्यांमध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका. कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही.    

टीप नंबर 6

सहावी टीप आहे एखादा पदार्थ लागल्यामुळे भांड खराब झाल्यास भांड कसं स्वच्छ करायचं हे सांगणारी

जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांड खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं. असं झाल्यास चहा करून उरलेल्या चोथा आणि पाणी त्या भांड्यात काहीवेळ घालून ठेवा. त्यानंतर स्वच्छ करा भांड अगदी चमकेल.

जर तुम्हाला या स्वंयपाक घरातल्या सोप्या टीप्स आणि ट्रीक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांना ही नक्की सांगा. अशाच काही खास किचन टीप्स घेऊन पुन्हा भेटू. तोवर एन्जॉय कुकिंग.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!